AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Installment : 9 लाख शेतकऱ्यांना लॉटरी! PM Kisan चा हप्ता जमा झाला खात्यात

PM Kisan Installment : आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला, त्यांच्या खात्याता पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता जमा झाला. त्यांच्या खात्यात रक्कम झाली. तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा..

PM Kisan Installment : 9 लाख शेतकऱ्यांना लॉटरी! PM Kisan चा हप्ता जमा झाला खात्यात
| Updated on: Jul 27, 2023 | 2:08 PM
Share

नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता (PM Kisan Installment) आज त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. राजस्थानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला. या योजनेतंर्गत 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला. या शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता जमा करण्यात आला होता. या योजनेतंर्गत तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर (Helpline Number) संपर्क साधा..

शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली

शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जमा करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले. 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले.

कशी करणार तक्रार

पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 18001155266

14वा हप्ताप्रकरणात अडचण असल्यास : 011-24300606

असे तपासा यादीत नाव

  1. 14 वा हप्ता जमा होणार आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही?
  2. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा
  3. याठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
  4. तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भरा
  5. सविस्तर माहिती द्या, या पर्यायावर क्लिक करा
  6. यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा
  7. योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल.

असे चेक करा बॅलेन्स

  1. योजनेतंर्गत 14 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. बँकेकडून खात्यात रक्कम जमा करण्याचा मॅसेज आला असेल. तसेच केंद्र सरकारतर्फे पण पीएम किसान योजनेचा मॅसेज लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आला आहे.
  2. काही तांत्रिक कारणामुळे मॅसेज चेक करता आला नसेल. तर लाभार्थी जवळच्या एटीएमवर जाऊन बँलेन्स चेक करु शकतो. तो मिनी स्टेटमेंट काढू शकतो. त्यावरुन बँक खात्यात रक्कम झाले की नाही, हे कळेल.
  3. शेतकऱ्याकडे एटीएम कार्ड नसेल तर तो जवळच्या बँकेतील शाखेत जाऊन पासबुक अपडेट करु शकतो. त्यावर आतापर्यंतच्या सर्व व्यवहाराची नोंद होईल. त्यावरुन खात्यात रक्कम आली की नाही हे समोर येईल.
  4. बँकेच्या मिस्ड कॉल क्रमांकाचा वापर करता येईल. मिस्ड कॉल देऊन तुम्हाला एकूण शिल्लक रक्कम माहिती होईल. त्यावरुन योजनेचा हप्ता जमा झाला की नाही, हे स्पष्ट होईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.