AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सब्र का फल मीठा होता है..! शेतकऱ्यांच्या एका निर्णयामुळे बदलले कापूस खरेदी केंद्रावरील चित्र

मध्यंतरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीच नसल्याने दर घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दरात विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता. शिवाय शेतकऱ्यांनी टप्प्य़ाटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला देण्यात येत होता. त्याचे पालन केल्यानेच बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने कापसाच्या दरात वाढ झाली आहे.

सब्र का फल मीठा होता है..! शेतकऱ्यांच्या एका निर्णयामुळे बदलले कापूस खरेदी केंद्रावरील चित्र
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 10:42 AM
Share

नंदुरबार : शेतात होणाऱ्या उत्पादनापेक्षा बाजारपेठेत शेतीमालाला काय दर आहे यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. हंगामाच्या सुरवातीला ( Cotton rate) कापसाचे दर 10 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले होते. मात्र, मध्यंतरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीच नसल्याने दर घसरले होते. त्यामुळे ( farmers’ decision) शेतकऱ्यांनी कमी दरात विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता. शिवाय (cotton storage) शेतकऱ्यांनी टप्प्य़ाटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला देण्यात येत होता. त्याचे पालन केल्यानेच बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने कापसाच्या दरात वाढ झाली आहे. नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून 7 हजारावर आलेले दर आता थेट 9 हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले आहेत.

उत्पादनात घट झाल्याचाही परिणाम

खरिपात कापसाचे क्षेत्र तर घटलेच होते. शिवाय पुन्हा अवकाळी पावसामुळे कापासाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ऐन बोंड अवस्थेत असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बोंड वाढीवर त्याचा परिणाम झाला होता. शिवाय ढगाळ वातावरणामुळे दिवसेंदिवस बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. अतिवृष्टीचा नाही पण कापूस अंतिम टप्प्यात असताना झालेला अवकाळी पाऊस व त्यानंतरचे वातावरण याचा सर्वाधिक परिणाम कापसावर झाला होता. आता मागणी वाढली असल्याने कापसाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दरात घट झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता.

शेतकऱ्यांचा निर्णय ठरतोय फायदेशीर

हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरातही मोठी घसरण झाली होती. त्या दरम्यान शेतकऱ्यांनी उत्पादनात घट होऊनही दर मिळत नसल्याने विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे दिवाळीनंतर का होईना सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. आता कापसाचेही त्याप्रमाणेच झाले आहे. सुरवातीला कापसाला 10 हजार रुपये प्रति क्विटलचा दर मिळाला होता. त्यानंतर मात्र, दरात घसरण झाल्याने कापूस थेट 7 ते 8 हजार रुपये क्विंटलवर येऊन ठेपला होता. त्यामुळेच शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला आणि चित्र बदलले आहे. आता नंदुबार बाजार समितीमध्ये 9 हजार रुपये दर मिळाला आहे. भविष्यातही आवक प्रमाणात राहिली तर यामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान

घटत्या दरामुळे शेतकरी अडचणीत आला होता मात्र आता मिळत आसलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कपासला बाजार समितीत चांगला भाव मिळत आसल्याने बाजार समितीतील कापसाची आवक वाढली आहे. समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर वाहनाच्या रांगा दिसू लागल्या आहेत.कापसाच्या दरात तेजी कायम राहण्याचा अंदाज बाजार समितीच्या जाणकारांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

काय सांगता..! भाजीपाल्यातूनही लाखोंचे कमाई, अनोखा प्रयोग राबवा अन् हेक्टरी 135 क्विंटल उत्पादन घ्या

शेतकरी संघर्ष संघटनेचे काय आहेत 9 ठराव ? कोरोना संकटानंतर पुन्हा संघटना सक्रीय

पावसाच्या तोंडावर काय आहे कृषीतज्ञांचा सल्ला, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....