महाराष्ट्रात यंदा शेतीतून विक्रमी उत्पादन होईल, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना विश्वास

यंदाच्या वर्षी विक्रमी शेतीचे उत्पादन होईल,असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. Vishwajeet Kadam farmers

महाराष्ट्रात यंदा शेतीतून विक्रमी उत्पादन होईल, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना विश्वास
विश्वजीत कदम

सांगली: राज्य सरकारकडून राबवलेल्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्रात गतवर्षी 12 टक्क्याने शेतीचे उत्पन्न वाढले आहे. यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने आधुनिक पद्धतीने खरिपाचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी विक्रमी शेतीचे उत्पादन होईल,असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Agriculture State Minister Vishwajeet Kadam said farmers take record break production this year)

शेतकऱ्यांना लागेल त्या गोष्टी उपलब्ध करुन देणार

यंदाच्या वर्षी हवामान खात्याकडून वेळेत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे. राज्य सरकारकडून त्यादृष्टीने जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरिपाच्या बैठकी पार पडलेल्या आहेत. योग्य त्या सूचना सर्व पातळ्यांवर देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना लागेल त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

लॉकडाऊनमध्ये शेतीचं उत्पन्न 12 टक्के वाढलं

गेल्या वर्षी महाराष्ट्रात लॉकडाऊन च्या परिस्थितीमध्ये शेतीचे 12 टक्के उत्पन्न वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडून आधुनिक पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. चांगला पाऊस,यामुळे यंदाच्या वर्षी राज्यात शेतीचा विक्रमी उत्पादन होईल, असा विश्वास विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

कलाकारांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न

सांगलीतील नमराह कोरोना सेंटर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सदिच्छा भेट दिली आहे.नमराह कोरोना सेंटरच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांवर माफक दरात उपचार करण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी नमराह कोरोना सेंटरला भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागात आज अनेक कोरोना विलागीकरण कक्ष सुरू आहेत, त्या ठिकाणी रूग्णांच्या करमणुकीच्या साठी आज जे कलाकार काम नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यांना कोरोना सेंटरच्या ठिकाणी करमणुकीचे कार्यक्रम उपलब्ध करून देत आर्थिक मदत देण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या:

त्रिपुराच्या युवा शेतकऱ्याची कमाल, काश्मिरी सफरचंदाच्या लागवडीतून 6 लाखांची कमाई

शेती क्षेत्र अर्थव्यवस्थेला सलग दुसऱ्या वर्षी तारणार, यंदा 3 टक्क्यांपेक्षा जास्त विकास दर राहणार: निती आयोग

(Agriculture State Minister Vishwajeet Kadam said farmers take record break production this year)