Crop Insurance : पीकविमा योजनेसाठी 35 लाख शेतकऱ्यांचे अर्ज, लातूर विभाग अव्वलस्थानी, काय आहे नेमकी प्रक्रिया?

ज्या टक्केवारीत पिकाचे नुकसान आहे त्याच तुलनेत भरपाई ही मिळणार आहे. याकरिता मंडळनिहाय झालेली नुकासन हे ग्राह्य धरले जाणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक अर्ज हे लातूर विभागातून तर सर्वात कमी अर्ज हे कोकण विभागातून दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर सातबारा उतारा, आठ 'अ', बॅंक पासबूक झेरॉक्स, पिकपेरा ही कागदपत्रे जमा करुन पिकाच्या प्रिमियम प्रमाणे हेक्टरी रक्कम द्यावी लागणार आहे.

Crop Insurance : पीकविमा योजनेसाठी 35 लाख शेतकऱ्यांचे अर्ज, लातूर विभाग अव्वलस्थानी, काय आहे नेमकी प्रक्रिया?
पीकविमा योजना
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 3:11 PM

लातूर : नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने (Central Government) केंद्र सरकारने (Crop Insurance) पीकविमा योजना सुरु केली आहे. पिकांचे नुकसान झाले तर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. सन 2022-23 या वर्षासाठी ही योजना सुरु असून 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता येणार आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमधून तब्बल 35 लाख शेतकऱ्यांचे अर्ज या योजनेत सहभाग व्हावा म्हणून आले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही वाढत आहे. शिवाय यंदा योजनेचे स्वरुप बदल्याचा परिणामही जाणवू लागला आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार तर आहेच पण राज्यातील 7 विभागापैकी (Latur Division) लातूर विभागातून सर्वाधिक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. आता 31 जुलैपर्यंत किती शेतकरी योजनेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवणार हे पहावे लागणार आहे.

बीड ‘पॅटर्न’ अन् सरकारी विमा कंपनी

यंदा प्रथमच बीड पॅटर्ननुसार पीकविमा योजना ही राबवली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. बीड पॅटर्नमध्ये विमा हप्त्याचे दायित्व हे 80:110 असे असणार आहे.विमा कंपनीला द्यावी लागणारी नुकसान भरपाई 110 टक्के पेक्षा अधिक असेल तर वरची रक्कम राज्य सरकार देईल आणि सदर नुकसान भरपाई ही 80 टक्के पेक्षा कमी असेल तर कंपनीला खर्चापोटी 20 टक्के रक्कम देऊन उर्वरित रक्कम राज्य सरकार घेणार आहे. तर आता खासगी विमा कंपन्यांचा समावेश होणार नाहीतर सरकारी विमा कंपन्यांचा हस्तक्षेप असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

जोखीम स्तरानुसार मिळणार परतावा

ज्या टक्केवारीत पिकाचे नुकसान आहे त्याच तुलनेत भरपाई ही मिळणार आहे. याकरिता मंडळनिहाय झालेली नुकासन हे ग्राह्य धरले जाणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक अर्ज हे लातूर विभागातून तर सर्वात कमी अर्ज हे कोकण विभागातून दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर सातबारा उतारा, आठ ‘अ’, बॅंक पासबूक झेरॉक्स, पिकपेरा ही कागदपत्रे जमा करुन पिकाच्या प्रिमियम प्रमाणे हेक्टरी रक्कम द्यावी लागणार आहे. यानंतरच शेतकऱ्याचा विमा योजनेत सहभाग आहे असे ग्राह्य धरले जाणार आहे. ही प्रक्रिया 31 जुलैपर्यंतच राहणार आहे.

लातूर विभाग अव्वलस्थानी

राज्यातून 21 जुलैपर्यंत 35 लाख 5 हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेसाठी अर्ज केले आहेत. शिवाय 31 जुलैपर्यंतच ही सेवा सुरु राहणार आहे. यंदा तर हंगामाच्या सुरवातीपासूनच निसर्गाचा लहरीपणा पाहवयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या वाढेल असा अंदाज आहे. लातूर विभागातून तब्बल 15 लाख 58 हजार 586 शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहेत. तर सर्वात कमी अर्ज हे कोकणातून आले आहेत. कोकणात अधिकचा पाऊस असतानाही केवळ 9 हजार 472 अर्ज दाखल झाले आहेत. यंदा विमा परताव्यासाठी एचडीएफसी इर्गो इंडिया कंपनी,भारतीय कृषी विमा योजना, आयसीआयसीआय लॉबार्ड जनरल इंडिया कंपनी, बजाज अलियान्स या कंपन्यांचा सहभाग राहणार आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.