मोठी बातमी, 37 लाख शेतकऱ्यांना मिळाला फायदा, सरकारकडून 72 हजार कोटी रुपयांच्या गव्हाची खरेदी

शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु करण्याचं काम सुरु आहे. wheat procurement

मोठी बातमी, 37 लाख शेतकऱ्यांना मिळाला फायदा, सरकारकडून 72 हजार कोटी रुपयांच्या गव्हाची खरेदी
Wheat
Yuvraj Jadhav

|

May 22, 2021 | 2:05 PM

नवी दिल्ली: शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु करण्याचं काम सुरु आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांकडून 2020-21 च्या खरिप आणि 201-22 च्या रब्बी हंगामात किमान आधारभूत किमतीला गव्हाची खरेदी केली जातेय. याअंतर्गत 14 मे 2021 पर्यंत 72 हजार 406.11 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. तर, किमान आधारभूत किमतीला 366.61 लाख मेट्रिक टन गहू शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे. तर, 37 लाख 15 हजार शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी करण्यात आलीय. ( Central and State Governments purchase wheat procurement of 72 thousand crore rupees)

धानाची खरेदी सुरु

धान उत्पादक शेतकऱ्यांकडून 14 मेपर्यंत 742.41 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये खरिप हंगामातील 705.52 लाख मेट्रीक टन तर रब्बी हंगामातील 36.89 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आलीय. किमान आधारभूत किमतीवर धान खररेदी सुरु आहे.

डाळीची रेकॉर्ड ब्रेक खरेदी

सन 2020-21 च्या खरिप हंगामात उत्पादित झालेल्या डाळींची देखील विक्रमी खरेदी सरकारी खरेदी केंद्राद्वारे करण्यात आलीय. मूग, उडीद, तूर, चना, मसूर, भुईमूग,सोयाबीन इत्यादी डाळींची 6 लाख 69 हजार 411 मेट्रीक टन खरेदी करण्यात आली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा आणि राजस्थान मधील 4 लाख 01 हजार 265 शेतकऱ्यांकडून 3 हजार 507.80 कोटींची डाळ खरेदी करण्यात आलीय.

कापूस खरेदी देखील सुरु

किमान आधारभूत किमंत योजनेद्वारे पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक राज्यामध्ये कापूस खरेदी सुरु आहे. 26 एप्रिलपर्यंत 18 लाख 86 हजार 498 शेतकऱ्यांकडून 26 हजार 719 कोटी रुपयांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर, किमान आधारभूत किमतीला 91 लाख 89 हजार 310 गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे.

याशिवाय 14 मे पर्यंत केंद्र सरकारने कर्नाटक मधील शेतकऱ्यांकडून 5089 मेट्रीक टन नारळ खरेदी केले आहेत, यासाठी 52.40 कोटी रुपये देण्यात आले. तर तामिळनाडू आणि कर्नाटकमधील 3961 शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

साखरेचं विक्रमी उत्पादन, कारखान्यांसमोर आता विक्रीचं आव्हान, सरकारची भूमिका काय?

कापूस शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी, यावर्षी मिळेल बंपर कमाई, निर्यातीतही होईल 20% वाढ

( Central and State Governments purchase wheat procurement of 72 thousand crore rupees)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें