शेतकऱ्यांचा नाद खुळा : कांद्याने झाली भरभराट, घरावर 150 किलोचा ‘स्टॅच्यू’ उभारुन केली उतराई

धनकवाडी प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांनी कांद्यामुळे हक्काचे घर मिळाले याची जाणीव ठेऊन घरावर चक्क 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. आज जे घर झाले आहे ते केवळ कांदा पिकामुळेच असाच संदेश त्यांना यामधून द्यायचा आहे. घरावरील 150 कांदा आता येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे.

शेतकऱ्यांचा नाद खुळा : कांद्याने झाली भरभराट, घरावर 150 किलोचा 'स्टॅच्यू' उभारुन केली उतराई
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन कांद्याची उतराई म्हणून घरावरच कांद्याची प्रतिकृती उभारली आहे.
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 4:20 PM

लासलगाव : दराबाबत कांदा हे पीक कीती लहरीपणाचे आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. पण याच पिकामुळे जेव्हा घर उभा राहते तेव्हा काय घडते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील धनकवाडी येथील (Farmer) शेतकरी बंधूंनी केलेल्या अनोख्या प्रयोगातून दाखवून दिले आहे. ऊसापाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हा (Onion Crop) कांदा लागवडीचा प्रयोग करतात. मात्र, दरातील लहरीपणामुळे कुणाचे साधते तर कुणाचे नुकसानही होते. ज्यांचा फायदा झाला आहे ते शेतकरी पुन्हा कसे उत्पादन वाढेल याचा धोरण आखतात. पण धनकवाडी प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांनी कांद्यामुळे हक्काचे घर मिळाले याची जाणीव ठेऊन घरावर चक्क 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. आज जे घर झाले आहे ते केवळ कांदा पिकामुळेच असाच संदेश त्यांना यामधून द्यायचा आहे. घरावरील 150 कांदा आता येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या (Nashik) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा अनोखा प्रयोग केल्यामुळे एक वेगळीच चर्चा रंगलेली आहे.

काय आहे यामगचा हेतू?

येवला तालुक्यातील धनकवाडी येथील प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांना मिळून तीस एकर शेती आहे पण येवला तालुका हा नेहमी दुष्काळी तालुका म्हणून राहिला आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दहा ते पंधरा एकर शेतामध्ये कांद्याचे पीक घेतले खर्च वजा जाता पंधरा लाख रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहिला या पैशांची करायचे काय तर दोन्ही भावांनी मिळून घर बांधण्याचा निर्णय घेतला. शेतात घर बांधले आणि कांदा हा लासलगाव बाजार समितीत विक्रीला नेला. त्यावेळी लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर बाजार समितीने नुकतेच कांद्याची प्रतिकृती ही उभारली आहे. आपणही कांद्यातून चांगला नफा मिळाला असल्याने आपल्याही बंगल्याच्या छतावर ही कांद्याची प्रतिकृती असावी म्हणून या अनिल आणि साईनाथ जाधव या दोघे भावंडांनी कांद्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला.

कशी सुचली संकल्पना?

कांदा पिकाच्या उत्पादनावरच जाधव बंधूनी भले मोठे घर हे शेतात बांधलेले आहे. कांदा पीक दराबाबत लहरीचे असले तरी परीश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी 15 एकरामध्ये कांद्याचे पीक घेतले. एवढेच नाही तर यामाध्यमातून त्यांना 15 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला होता. दरम्यानच्या काळात त्यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कांद्याची प्रतिकृती पाहिली होती. येथील बाजारपेठ ही अशिया खंडात कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे त्यांनी हे वेगळेपण केले तर ज्यामुळे आपले घर उभा राहिले त्या कांद्यासाठी त्यांनी हे अनोखा प्रयोग केला आहे. घरावरच कांद्याची प्रतिकृती उभारली आहे.

150 किलो वजन अन् 18 हजार रुपये खर्च

हौशेला मोल नाही त्याप्रमाणे जाधव शेतकरी बंधूंनी आपली हौस पूर्ण करुन घेतली आहे. यासाठी त्यांना 18 हजार रुपये खर्च आला पण आपले घर जे उभे आहे ते केवळ कांद्यामुळेच याची जाणीव ठेवण्यासाठी त्यांनी हा अट्टाहास केला आहे. या प्रतिकृती असलेल्या कांद्याचे वजन हे 150 किलो आहे. हा कांदा महाकाय असल्याने दूरवरुन जाणाऱ्यांचेही लक्ष वेधून घेत आहे.

संबंधित बातम्या:

Pomegranate Orchard : तेल्याचा सामना करण्यापेक्षा डाळिंब बागा तोडलेल्या बऱ्या, का होत आहेत शेतकरी हतबल?

Latur Market: सोयाबीन दरात चढ-उतार असतानाही विक्रमी आवक, काय आहेत कारणे?

Mango: आंबा लागवडीपासून ते काढणीपर्यंत ‘अशी’ घ्या काळजी, तरच उत्पादनात होईल वाढ

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.