AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषीपंपधारकांना महावितरणकडून नवसंजिवनी, 12 लाख शेतकऱ्यांना विजबिलात सवलत

पुणे परीमंडळाने रामबाण उपाय काढलेला आहे. कृषिपंप वीज बिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी थेट ग्राहकांनाच 66 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे या परीमंडळातील तब्बल 12 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे थकलेली विजबिल वसुली तर झालीच पण आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाही नवसंजीवनी मिळाली आहे.

कृषीपंपधारकांना महावितरणकडून नवसंजिवनी, 12 लाख शेतकऱ्यांना विजबिलात सवलत
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 5:33 PM
Share

मुंबई : कृषीपंपाची वाढती थकबाकी हा महावितरणाचा कायम अडचणीचा विषय राहिलेला आहे. अनेकवेळा अवाहन करुनही शेतकरी हे बील अदा करीत नाहीत.  (state government) मात्र, यावर पुणे परीमंडळाने रामबाण उपाय काढलेला आहे. ( Agricultural pump consumers) कृषिपंप वीज बिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी थेट ग्राहकांनाच 66 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे या परीमंडळातील तब्बल 12 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे थकलेली विजबिल वसुली तर झालीच पण आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाही नवसंजीवनी मिळाली आहे.

घरगुती किंवा औद्योगिक वसाहतीमधील विजबिल वसुला नियमित होत असली तरी कृषिपंप धारक हे विजबिल अदाच करीत नाहीत. शिवाय शेती सिंचनाचा विषय असल्याने येथील वीज पुरवठाही खंडीत करता येत नाही. त्यामुळे पुणे परीमंडळाने राबवलेल्या अनोख्या प्रकारामुळे वसुलीही होत आहे आणि शेतकऱ्यांना सवलतही मिळत आहे.

शेतकरीही आर्थिक संकटात

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कृषीपंप वीज बिलाच्या थकबाकीमुक्तीसाठी 66 टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे पुणे परीमंडळातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. शिवाय शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा येत्या मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल 4 हजार 3 कोटी रुपयांची माफी मिळणार आहे.

1 लाख 80 हजार शेतकरी थकबाकीतून मुक्त

कृषिपंप वीजजोडणी धोरणातून कृषिपंप वीज बिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे 66 टक्के सूट देण्यात येत आहे. याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील 1 लाख 80 हजार शेतकऱ्यांनी या सवलतीचा लाभ घेतलेला आहे. तर पुणे परीमंडळातील 13 हजार 754 शेतकरी हे थकबाकीमुक्त झाले आहेत. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट असल्याने किमान चालू वीज बिलांचा भरणा करण्याचे अवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

असा मिळाला सवलतीचा लाभ

कृषीपंपधारकांकडे दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा हा वाढत आहे. शिवाय बिल भरुन घेण्यासाठी आतापर्यंत एक ना अनेक योजना महावितरणच्या माध्यमातून अवलंबण्यात आल्या आहेत. मात्र, शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने थेट विजबिलातच 66 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील 12 लाख 50 हजार शेतकऱ्यांकडे 10 हजार 841 कोटींची मूळ थकबाकी आहे. यातील 2644 कोटी 77 लाख रुपये महावितरणडून सूट देण्यात आली, तसेच थकबाकीवरील व्याजही माफ करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

105 लाख टन ऊसाला 91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन, उतार कमीच

आनंदवार्ता : सोयाबीन 6 हजाराच्या पार, शेतकऱ्यांचा संयम आला कामी

PM किसान योजनेत अनियमितता, महाराष्ट्रातील 4 लाख 45 हजार शेतकऱ्यांना द्यावा लागणार परतावा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.