सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत, 10 दिवसांत नोंदणी करुन लाभ मिळवा

Farmers Scheme| त्यासाठी शेतकऱ्यांना 25 जूनपर्यंत मेरा पानी-मेरी विरासत योजनेच्या (Mera Pani Meri Virasat Scheme) पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तसेच एग्रो फारेस्ट्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी एका एकरात 400 झाडे लावली असतील तर त्यांना 10 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत, 10 दिवसांत नोंदणी करुन लाभ मिळवा
मेरा पानी मेरी विरासत योजना
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 12:45 PM

चंदीगढ: हरियाणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. धान्याच्या उत्पादनाऐवजी कमी पाणी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) हा लाभ मिळणार आहे. सध्याच्या घडीला हरियाणात 1,26,928 हेक्टरवर धान्याशिवाय इतर पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. अशा पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. (Good News for farmers will get 7000 rupees annually under mera pani meri virasat scheme in Haryana)

त्यासाठी शेतकऱ्यांना 25 जूनपर्यंत मेरा पानी-मेरी विरासत योजनेच्या (Mera Pani Meri Virasat Scheme) पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तसेच एग्रो फारेस्ट्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी एका एकरात 400 झाडे लावली असतील तर त्यांना 10 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

PM Kisan : पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे अपात्र शेतकरी केंद्राच्या निशाण्यावर, पैसे परत घेण्याचं काम सुरु

योजनेचा लाभ कसा मिळवाल?

मेरा पानी-मेरी विरासत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नेहमीच्या धान्याऐवजी मका, बाजरी या कमी पाणी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. या पिकांसाठी किमान हमीभाव दिला जाईल. तसेच पीक विमा योजनेचाही लाभ मोफत मिळेल.

मेरा पानी-मेरी विरासत योजनेच्या पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांना आपण किती एकरात पीक घेतले आहेत, ही माहिती नमूद करावी लागेल. या माहितीची पडताळणी केली जाईल. यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. यामध्ये कोणतेही अडथळे येता कामा नये, असे निर्देश सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे झज्जर जिल्ह्यातील ढाकला गावातील शेतकऱ्यांनी यावेळी सामूहिकरित्या धान्याची शेती न करण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या:

शिवगामी तांदूळ, कटप्पा तांदूळ, बाहुबलीतील व्यक्तिरेखांची बियाण्यांना नावं, खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी

पारंपारिक शेतीला नवा पर्याय, चिया सीड शेतीतून एका एकरात 6 लाख रुपये कमावण्याची संधी

शेतकऱ्यांना मालामाल बनवेल ‘ही’ औषधी वनस्पती, एका एकरात 4 लाख रुपयांपर्यंत कमाईची संधी

(Good News for farmers will get 7000 rupees annually under mera pani meri virasat scheme in Haryana)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.