गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट, झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी यंदाही निराशाच

गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट, झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी यंदाही निराशाच
Marigold Flower

गुढीपाडवा सण अवघ्या एका दिवसावर आल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील झेंडूची फुले (Marogold Flower) तोडण्याची कामे सुरु केली आहेत.

Nupur Chilkulwar

|

Apr 12, 2021 | 1:58 PM

पुणे : गुढीपाडवा सण अवघ्या एका दिवसावर आल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील झेंडूची फुले (Marogold Flower) तोडण्याची कामे सुरु केली आहेत. मात्र, कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या सावटामुळे यावर्षी झेंडूच्या फुलांना अत्यल्प दर मिळत असल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पहिला मिळत आहे (Gudhi Padva Farmers Are Not Getting Price For The Marigold Flowers).

हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. महत्वाचा मुहूर्त आणि हिंदू नववर्षदिन यामुळे गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरातील देव-देवतांबरोबर, आपापल्या व्यवसायातील गाडी-घोड्यांचीही पूजा केली जाते. तर दुकानाच्या, घरांच्या दारांवर पाना-फुलांची तोरणे बांधली जातात.

गुढीपाडव्याच्या या संपूर्ण पूजेमध्ये झेंडूच्या फुलाला मोठं महत्व असतं. त्यामुळे दरवर्षी गुढीपाडवा सणाच्या दिवशी झेंडूच्या फुलांची शहरात मोठ्या प्रमाणात आणि चढ्या बाजारभावात विक्री होते. या गोष्टींचा फायदा घेण्यासाठी अनेक शेतकरी या काळात आपल्या शेतात झेंडूच्या पिकाची लागवड करतात.

दरवर्षी गुढीपाडवा आणि लग्नाच्या हंगामामध्ये हमखास पैसे मिळवून देणारे हक्काचे पीक म्हणून शेतकरी झेंडूचे पीक घेतात. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे गेल्या वर्षी आणि याही वर्षी झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना दर वर्षी सुमारे 75 ते 150 रुपये प्रतिकोलो भेटणारा बाजारभाव यावर्षी मात्र 15 ते 25 रुपये प्रती किलोपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

गुढीपाडव्याची तिथी आणि शुभ मुहूर्त

गुढीपाडव्याचा उत्सव – 13 एप्रिल 2021

प्रतिपदा तिथीची सुरुवात – 12 एप्रिल 2021 ला रात्री 8 वाजता

गुढी पाडव्याची पूजा पद्धत

1. गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे. 2. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं. 3. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. गुढीला आंब्याची पाने, नवे कपडे आणि फुलांनी सजावलं जाते. 4. नंतर लोक भगवान ब्रह्माची पूजा करतात. 5. गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची पूजा केली जाते.

Gudhi Padva Farmers Are Not Getting Price For The Marigold Flowers

संबंधित बातम्या :

10 हजार रुपयांमध्ये काळी मिरची शेतीला सुरुवात, आता वर्षाला 19 लाखांची कमाई करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा

लॉकडाऊन लागल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 63 हजार कोटी, कोणत्या योजनेद्वारे सरकारनं दिले पैसे?

फक्त 55 रुपयांच्या बचतीवर वर्षाला 36 हजार मिळणार, पीएम किसान मानधन योजनेसाठी 21 लाख शेतकऱ्यांची नोंदणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें