AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rabi Season : सुगीवर चिंतेचे ढग, खरिपाप्रमाणेच रब्बीचीही अवस्था, काय आहे शेतशिवारातले चित्र?

गेल्या वर्षभरात कधी गरज आहे तेव्हा पावसाचे आगमन झाले असे नाही. यामुळेच खरिपातील उत्पादनात मोठी घट झाली होती. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकपध्दतीमध्ये बदल केला आहे. पारंपरिक पिकांची जागा ही कडधान्यांनी घेतली असून सध्या रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी कामे सुरु आहेत. असे असतानाच पुन्हा निसर्गाने आपला लहरीपणा दाखवण्यास सुरवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काढणीला आलेल्या ज्वारीचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Rabi Season : सुगीवर चिंतेचे ढग, खरिपाप्रमाणेच रब्बीचीही अवस्था, काय आहे शेतशिवारातले चित्र?
रब्बी हंगामातील ज्वारी काढणी झाली आहे. पण ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी अशाप्रकारे पीक सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 12:02 PM
Share

नांदेड : गेल्या वर्षभरात कधी गरज आहे तेव्हा पावसाचे आगमन झाले असे नाही. यामुळेच (Kharif Season) खरिपातील उत्पादनात मोठी घट झाली होती. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकपध्दतीमध्ये बदल केला आहे. (Traditional Crop) पारंपरिक पिकांची जागा ही कडधान्यांनी घेतली असून सध्या रब्बी हंगामातील (Jowar Crop) ज्वारीची काढणी कामे सुरु आहेत. असे असतानाच पुन्हा निसर्गाने आपला लहरीपणा दाखवण्यास सुरवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काढणीला आलेल्या ज्वारीचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची काढणी कामे सुरु असतानाच पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागणार अशीच परस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातही ऐन काढणीच्या दरम्यानच अवकाळीची अवकृपा झाल्याने उत्पादनात घट झाली होती. तीच परस्थिती पुन्हा ओढावू नये म्हणून शेतकरी कुटुंब रात्रीचा दिवस करुन शेती कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

अणखी दोन दिवस धोक्याचेच

सबंध मराठवाड्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी कामे सुरु आहेत. असे असतानाच पावसाचे आगमन झाले तर उत्पादनात घट तर होणारच आहे पण काढणी केलेला शेतीमाल काळवंडला जाण्याची भीती आहे. गेल्या वर्षभरापासून अवकाळी ही नुकसानीची ठरत आहे. आतापर्यंतच्या पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके बहरात होती. त्यामुळे उत्पादनवाढीची अपेक्षा आहे. पण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात 26 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे काढणी आणि मोडणी झालेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

नेमके नुकसान काय?

रब्बी हंगामातील सर्वच पीके ही परिपक्व अवस्थेत आहेत. यंदा उशिराच्या पेरण्यामुळे सुगी महिनाभर लांबणीवर पडलेली आहे. दरवर्षी अवकाळीचा धोका असतो पण तो एक-दोन दिवसापूरता मर्यादीत. यंदा मात्र, सर्वकाही नुकसान झाल्यावरच अवकाळी उघडीप देत आहे. मध्यंतरी द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आता आंब्याचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. आता पावसाने हजेरी लावली तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यासह नांदेड जिल्ह्यामध्ये अंतिम टप्प्यात असलेल्या हळदीचे नुकसान होणार आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?

पिकांची काढणी करुन ते वावरात ठेवण्यापेक्षा त्याची लागलीच मोडणी करुन सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे महत्वाचे आहे. शिवाय काढणी आणि मोडणी झाली की यंत्राच्या सहायाने लागलीच ज्वारी करुन घेणे महत्वाचे आहे. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव राहणार असून वातावरण निरभ्र झाले की लागलीच फवारणी करण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Onion Market :आता उलटी गणती सुरु, महिन्यातच बदलले कांदा Market, उन्हाळी कांदा काढणीला पण करायचे काय?

Mango : नुकसानीनंतरही फळांच्या ‘राजा’चा तोरा कायम, स्थानिक बाजारपेठेत हापूस दाखल..!

Watermelon: शेतकऱ्यांना बाजारपेठेचे गणित कळलं अन् बाजारभावाचं सूतही जुळलं, ठोक विक्रीपेक्षा किरकोळ विक्रीवर भर

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.