Latur Market: खरिपातील ‘या’ दोन्हीही पिकांचे वाढले दर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना दिलासा

खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले असले तरी वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात तर वाढ होतच आहे पण बाजारपेठेत नव्याने दाखल होत असलेल्या तुरीच्याही दरात वाढ होत असल्याचे पाहवयास मिळत आहे. सोयाबीन आणि तुरीसाठी लातूर बाजारपेठ ही महत्वाची आहे.

Latur Market: खरिपातील 'या' दोन्हीही पिकांचे वाढले दर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना दिलासा
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली असल्याने आवकही वाढली आहे.
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 1:51 PM

लातूर : खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले असले तरी वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून मुख्य पीक असलेल्या (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात तर वाढ होतच आहे पण बाजारपेठेत नव्याने दाखल होत असलेल्या तुरीच्याही दरात वाढ होत असल्याचे पाहवयास मिळत आहे. सोयाबीन आणि तुरीसाठी लातूर बाजारपेठ ही महत्वाची आहे. कारण याच परिसरात तेल (Process Industry) प्रक्रिया उद्योग आणि दाळ मिलची संख्याही अधिक आहे. त्यामुळे (Latur Market) लातूरच्या मार्केटवरच इतर बाजार समित्यांमधील दर ठरतात. गेल्या चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरात 250 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे दर हे स्थिरावलेले होते. आता कुठे त्यामध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे तुरीच्या दरातही वाढ होत आहे. नव्याने दाखल होत असलेल्या तुरीला 6 हजार 100 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी आता वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा आहे.

…म्हणून खुल्या बाजारपेठेलाच पसंती

नाफेडच्यावतीने तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. 1 जानेवारीपासून राज्यात 186 केंद्र सुरु करण्यात आली असून केंद्र सुरु झाल्यापासून खुल्या बाजारात तुरीचे दर 400 रुपयांनी वाढलेले आहेत. खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 तर खुल्या बाजारपेठेत 6 हजार 100 रुपये दर मिळत आहे. मात्र, खरेदी केंद्रावरील नियम-अटी यामुळे शेतकरी थेट खुल्या बाजारातच विक्री करीत आहे. शिवाय आर्द्रतेच्या नावाखाली तुरीची खरेदी केली जात नाही. शिवाय खरेदी झाली तरी वेळेत पैसे मिळत नाहीत. सुविधांपेक्षा अडचणी अधिक असल्यामुळे शेतकरी खरेदी केंद्राकडे पाठव फिरवत आहे.

सोयाबीनचे दर वाढले की आवकवर परिणाम

गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर हे 6 हजारावरच स्थिरावले होते. मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये 6 हजार 350 पर्यंत दर गेले आहेत. त्यामुळे आता साठवणूकीतील सोयाबीन हे बाजारात येत आहे. त्यामुळेच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी सोयाबीनची आवक 22 हजार पोते एवढी झाली होती तर 6 हजार 350 रुपये दर मिळाला होता. हंगामाची सुरवात निच्चांकी दराने झाली असली तरी दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

खरिपातील सोयाबीन आणि तुरीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता साठवणूकीतल्या सोयाबीनची विक्री करणे गरजेचे आहे. भविष्यात उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु झाली तर याचा दरावर परिणाम होऊ शकतो. शिवाय नव्याने बाजारात दाखल होत असलेल्या तुरीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण 10 पर्यंत कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Rabbi Season: वातावरणातील बदलामुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची अनोखी शक्कल, थेट..

Photo Gallery: केळी बागांवर विघ्न कायम, बागा अंतिम टप्प्यात असतानाही कशाचा धोका?

Mango Rate : बाजारात उशिरा एंन्ट्री तरीही ‘राजा’चा रुबाब कायम, हापूसला कोल्हापुरात विक्रमी दर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.