शेतकऱ्यांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा चक्रीवादळाचा इशारा, मान्सूनवर परिणाम होणार?

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पूर्वमध्य समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. 14 मे ते 16 मे दरम्यान समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. (India meteorological Department Low Pressure Area Arebian Sea Sea Storm)

शेतकऱ्यांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा चक्रीवादळाचा इशारा, मान्सूनवर परिणाम होणार?
चक्रीवादळ
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 1:53 PM

मुंबई : अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने येत्या 16 मे रोजी चक्रीवादळ धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. जर हे चक्रीवादळ आलं तर मान्सूनवर देखील परिणाम होणार आहे. सर्वसाधारणपणे मान्सूनचं केरळात 1 जूनला आगमन होतं.  (India meteorological Department Low Pressure Area Arebian Sea Sea Storm)

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पूर्वमध्य समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. 14 मे ते 16 मे दरम्यान समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे.

अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. त्या चक्रीवादळाला म्यानमारने टाँकटाइ असं नाव दिलं आहे. केरळ, गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात किनारपट्टीला वादळाकडून नुकसान पोहचण्याची शक्यता आहे.

India meteorological Department Low Pressure Area Arebian Sea Sea Storm

चक्रीवादळाचा इशारा

चक्रीवादळ कोणत्या दिशेने जाणार?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निप्माण होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतं. लक्षव्दीप आणि केरळमध्ये हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. चक्रीवादळ पुढे कुठल्या दिशेने जाईल हे आताच सांगणं कठीण आहे.

मान्सूनवर परिणाम होणार

चक्रीवादळ आल्यास त्याचा परिणाम मान्सूनवरही होईल. मान्सून लांबण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 7 जूनच्या दरम्यान मान्सूनचं आगमन होत असतं. चक्रीवादळाच्या संभाव्य इशाऱ्याने मान्सूनच्या आगमन कधी होतंय, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत.

मान्सून लांबला तर शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार

खरीप पिकांची पेरणी 15 जूनपासून सुरू होते. जूनमध्ये मान्सूनचा पाऊस पडल्यास त्याचा थेट परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर होईल. परिणामी शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागेल.

भारतात मान्सून का महत्त्वाचा?

सुमारे 40 टक्के लोक अद्याप शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अनेक राज्यांतील शेतकऱ्यांना जर मान्सून चांगला झाला तरच शेतीत फायदा होतो. पण जर मान्सूनने धोका दिला तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. कारण आणखीही तिथे सिंचनाने पर्याय उपलब्ध नाहीयत.

(India meteorological Department Low Pressure Area Arebian Sea Sea Storm)

हे ही वाचा :

Weather Alert | मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, पावसामुळे थंडी गायब

Weather Alert | येत्या 24 तासात पावसाची शक्यता, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.