मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात पालेभाज्यांची लागवड, दीड एकर शेतीतून लाखो उत्पन्न

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Namrata Patil

Updated on: Jun 20, 2021 | 1:16 PM

कोरोनाच्या पहिल्या लाटेत टाळेबंदीत महाविद्यालय बंद होते. त्यामुळे त्यांच्या मुलींनीही त्यांना या कामात हातभार लावला.  Kanse Family Cultivation of vegetables in Melghat)

मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात पालेभाज्यांची लागवड, दीड एकर शेतीतून लाखो उत्पन्न
vegetables Cultivation Melghat 1

अमरावती : कोरोना काळात सर्वांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. एकीकडे शेतीतून उत्पादन होत नसल्याने शेतकरी बेरोजगार झाले आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. तर दुसरीकडे मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या एका कुटुंबाने शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले जात आहे. या भागात विकासाचा अभाव, खडकाळ जमीन असली तरी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर कणसे कुटुंबाने रान फुलवले आहे.  (Kanse Family Cultivation of vegetables in Melghat get lakhs of rupees income from agriculture)

दीड एकर शेतात पालेभाज्यांची लागवड

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील चित्री गावात धारणी परतवाडा रोडवर पालेभाज्या विकणारी ही आहे एकता कणसे.. त्यांच्याकडे दीड एकर ओलिताची शेती आहे. यामध्ये ते पालेभाज्याची लागवड करतात. याच शेतातील ताजा भाजीपाला ते शेताबाहेर रस्त्यावर दुकान थाटून विकतात. यातून त्यांना चांगला नफा देखील मिळतो. विशेष म्हणजे या सर्व पालेभाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकवत असल्याने धारणी परतवाडा रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक आवर्जून या ठिकाणी थांबतात. त्या ताज्या पालेभाज्या खरेदी करतात.

कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल या योजनेतून त्यांनी शेतासमोर हे दुकान थाटलं आहे. त्यामुळे त्याचा दळण वळणाचा खर्च देखील वाचला आहे. संपूर्ण कणसे कुटुंब स्वतः शेतात राबून शेती करतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत टाळेबंदीत महाविद्यालय बंद होते. त्यामुळे त्यांच्या मुलींनीही त्यांना या कामात हातभार लावला.

vegetables Cultivation Melghat 1

vegetables Cultivation Melghat 1

किती उत्पन्न?

कणसे कुटुंबांनी पालेभाज्यासह मका देखील लावला. यात त्यांना 18 क्विंटलच उत्पादन देखील झालं. त्यासोबत पालेभाज्या विक्रीतून त्यांना दर दिवसाला 6 हजार मिळतात. त्यामुळे दर महिना त्याचे उत्पन्न साधारण दीड लाख रुपये होते.

यशोमती ठाकूरांकडूनही पालेभाजी खरेदी 

विशेष म्हणजे पालकमंत्री यशोमती ठाकूर या काही दिवसांपूर्वी मेळघाट दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी थांबून पालेभाजी खरेदी केली होती. त्यामुळे शेतीच योग्य नियोजन केले तर शेतीत नक्कीच फायदा होतो, असे मत कणसे कुटुंबांनी व्यक्त केलं आहे. (Kanse Family Cultivation of vegetables in Melghat get lakhs of rupees income from agriculture)

संबंधित बातम्या : 

बीड पॅटर्नसाठी उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना साकडं, स्वाभिमानीचं बीड पॅटर्न विरोधात बोंब मारो आंदोलन

नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय

जळगावातील केळी उत्पादकांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे कूच, 20 मेट्रिक टन केळीचा कंटेनर दुबईला रवाना

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI