AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grape : आता द्राक्ष खरेदीतील फसवणूकीला बसणार आळा, उत्पादक संघाच्या निर्णयावर होणार का शिक्कामोर्तब?

द्राक्षांचे तोंडी सौदे आणि खरेदीतून होणारी फसवणूक रोखण्यासाठी द्राक्ष उत्पादक संघाकडून एक रामबाण उपाय मांडला जात आहे. याकरिता लोकप्रतिनीधी, अभ्यासू वकील यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. त्यानुसार आता द्राक्ष खरेदीचे केवळ तोंडी सौदे होणार नाहीत तर सौद्याची पावती तयार केली जाणार आहे.

Grape : आता द्राक्ष खरेदीतील फसवणूकीला बसणार आळा, उत्पादक संघाच्या निर्णयावर होणार का शिक्कामोर्तब?
द्राक्षाची निर्यात सुरु आहे पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
| Updated on: Feb 10, 2022 | 2:42 PM
Share

नाशिक : द्राक्षांचे तोंडी सौदे आणि खरेदीतून होणारी फसवणूक रोखण्यासाठी (Grape Growers Association) द्राक्ष उत्पादक संघाकडून एक रामबाण उपाय मांडला जात आहे. याकरिता लोकप्रतिनीधी, अभ्यासू वकील यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. त्यानुसार आता (Buying Grapes) द्राक्ष खरेदीचे केवळ तोंडी सौदे होणार नाहीत तर सौद्याची पावती तयार केली जाणार आहे. त्यामुळे लेखी पध्दतीने व्यवहार होणार असून यामुळे फसवणूकीच्या प्रकाराला आळा बसणार आहे. द्राक्ष तोडणीच्या आगोदर केवळ (Grape Deals) तोंडी सौदे होत असल्याने मालाची खरेदी होणारच असे नव्हते. व्यापारी त्यांना नुकसान दिसल्यास सौदे होऊन देखील खरेदीकडे पाठ फिरवत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना काय भूमिका घ्यावी याबाबत द्वीधा मनस्थिती होत असत. आता लेखी पुरावा असल्यामुळे खरेदी करणे हे बंधनकारक राहणार आहे. यापुर्वी फसवणूकीचे प्रकार झाल्यामुळे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचेच अधिकचे नुकसान झाल्यामुळे द्राक्ष लेखी पध्दतीने खरेदी-विक्री केली जाणार असल्याची भूमिका द्राक्ष उत्पादक संघाने घेतलेली आहे.

द्राक्ष खरेदी-विक्रीमध्ये कायद्याचा आधार

राज्यात सध्या केवळ तोंडी द्राक्ष खरेदीचे सौदे आहेत. यानुसार इसार स्वरुपात काही रक्कम दिली जाते. मात्र, यानंतरही खरेदीवरुन फसवणूकीच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये काही पुरावेही नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. शिवाय दिवसेंदिवस हे प्रकार वाढत आहे. हंगामाच्या सुरवातीला व्यापारी सौदे करण्यास तयार होतात मात्र, ऐन वेळी माघार घेत असल्यामुळे द्राक्षाची विक्री करावी की नाही हे कोडे शेतकऱ्यांसमोर असायचे. त्यामुळे आता कायद्याचा आधार घेण्याच्या तयारीत द्राक्ष उत्पादक संघ आहे.

दोन महिन्यापासून बांधणी

द्राक्ष विक्रीमध्ये लेखी सौदे ही पध्दत रुजवण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून प्रयत्न केले जात आहेत. यासंबंधी लोकप्रतिनिधी, कायदे विषयक तज्ञ, पोलिस प्रशासन यांच्यासोबत द्राक्ष बागायतदार संघाने विविध विषयांवर चर्चा केली आहे. त्यानुसारच या निर्णयापर्यंत संघ पोहचलेला आहे. तोंडी व्यवहरात सौदे होऊन देखील ठरविण्यात आलेले पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे या निर्णयापर्यंत बागायदतदार संघ पोहलेला आहे. तोंडी सौद्यांमुळे येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणीवर यामुळे मात होणार असल्याचा विश्वास बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.

नाशिक पॅटर्न राज्यभर व्हावा

जिल्ह्यात द्राक्षाचे मोठे उत्पादन असल्यामुळे व्यवहरातील बारकावे लक्षात आले आहेत. यातूनच तोंडी सौदे कीती धोकादायक आहेत हे ही समोर आले आहे. हा निर्णय काही एका दिवसामध्ये झालेला नाही तर यासाठी दोन महिन्यापूर्वीच बागायतदार संघाला सूचित केले होते. त्यानुसार सुरु झालेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात येत आहे. यामुळे सौद्याचा लेखी पुरावा राहणार आहे. त्यामुळे व्यापारी खरेदीसाठी बांधील राहतील आणि शेतकऱ्यांची फसवणूक ही होणार नाही. हीच पध्दत प्रत्येक शिवारात राबवून नाशिकचा हा पॅटर्न राज्यभर राबवण्याची गरज असल्याचे पालिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market: खरिपातील ‘या’ दोन्हीही पिकांचे वाढले दर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना दिलासा

Rabbi Season: वातावरणातील बदलामुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची अनोखी शक्कल, थेट..

Photo Gallery: केळी बागांवर विघ्न कायम, बागा अंतिम टप्प्यात असतानाही कशाचा धोका?

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.