AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi आम्हीच कमी पडलो, कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच होते : पंतप्रधान मोदी

गेल्या अनेक दिवसांपासून तीन कृषी कायद्यांना घेऊन राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरु आहे. मात्र, सुधारित कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्याच हीताचे होते. याला काही शेतकरी गटाचा विरोध कायम राहिलेला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक काळ न ठेवता आता कृषी कायद्यातील बदलाचे कायदेच सरकार माघार घेत असल्याची घोषणाच पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली.

PM Modi आम्हीच कमी पडलो, कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच होते : पंतप्रधान मोदी
Narendra Modi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 19, 2021 | 9:45 AM
Share

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून तीन कृषी कायद्यांना घेऊन राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरु आहे. मात्र, सुधारित कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्याच हीताचे होते. याला काही शेतकरी गटाचा विरोध कायम राहिलेला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक काळ न ठेवता आता कृषी कायद्यातील बदलाचे कायदेच सरकार माघार घेत असल्याची घोषणाच पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली.

देशातील विशेषकरुन लहान- मोठ्या शेतकऱ्यांसाठी हे कृषी कायद्यातील बदल परिणामकारक ठरणार होते. मात्र, याचे महत्व काही शेतकरी गटाच्या लक्षात आले नाहीत. शिवाय याला काही घटकांकडून विरोध राहिलेला आहे. एवढे होत असताना शेतकरी संघटनांच्या बैठका दरम्यान, त्यांनी सुचवलेले बदल करण्यास सरकार तयारही होते. त्यानंतर हा विषय सर्वेच्च न्यायालयातही गेला होता. या सर्व गोष्टी देशातील जनतेसमोर आहेत. मात्र, या सुधारित कायद्यातील धोरणे बाजूला ठेवत सातत्याने विरोध झाला आहे. त्यामुळे सरकारच कुठेतरी कमी पडले आहे. देशावासियांची माफी मागून कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली.

अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते कृषी कायदे

शेतकऱ्यांच्या बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास करुन कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे शेतीमालाचा दर हा शेतकऱ्यांनाच ठरविता येणार होता. मात्र, सरकारच्या या निर्णयाला कायम विरोध होत असल्याने हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. ऐवढेच नाही तर मनोगत व्यक्त करताना त्यांनी देशातील शेतकऱ्यांचीही माफी मागून आंदोलन मागे घेण्याचे अवाहन केले.

महिन्याच्या अखेरीस कायदे रिपील

आम्ही काही सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज प्रकाशपर्व आहे. यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्यम घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस संसद सत्रात ही कायदे रिपील करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या :

Breaking News: मोदींनी देशाची माफी मागितली, वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेण्याचीही घोषणा

Narendra Modi on Farm Law: केंद्रीय कृषी कायदे रद्द, सर्वात मोठी घोषणा करताना नरेंद्र मोदी काय म्हणाले?

Modi Address to Nation LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा, वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...