MLA Ravi Rana : महाबीजचे खच्चीकरण करुन खासगी कंपन्यांना वाव देण्यात ठाकरे सरकारची धन्यता, बियाणे पुरवठ्यातही राजकारण

सध्या राज्यभर खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. काही भागामध्ये पावसाने हजेरी लावल्याने खत- बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सुरवातही केली आहे. असे असताना अमरावती जिल्ह्याला मागणीच्या तुलनेत नगण्य पुरवठा झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारचा उद्देश हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा आहे की कमी करण्याचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

MLA Ravi Rana : महाबीजचे खच्चीकरण करुन खासगी कंपन्यांना वाव देण्यात ठाकरे सरकारची धन्यता, बियाणे पुरवठ्यातही राजकारण
आ. रवी राणा Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 5:00 PM

अमरावती :  (Mahabeej Seed) महाबीजच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना बियाणांचा पुरवठा केला जातो. मात्र, याच (Seed Company) बियाणे कंपनीचे खच्चीकरण करुन इतर खासगी कंपन्यांना वाव देण्याचा घाट (State Government) ठाकरे सरकारकडून केला जात असल्याचा आरोप आ. रवी राणा यांनी केला आहे. इतर खासगी कंपन्याना वाव देण्यामागे अर्थार्जानाचा उद्देश असून स्वार्थापुढे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा देखील विचार करीत नाही. आता खरीप हंगाम तोंडावर असताना मागणीपेक्षा कमी बियाणांचा पुरवठा करुन शेतकऱ्यांची अडचण केली जात असल्याचा घणाघात आ. रवी राणा यांनी ठाकरे सरकरावर केला आहे. बियाणांच्या किमंतीमध्ये वाढ तर झालीच आहे पण बियाणे पुरवठ्यावरुन देखील राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अमरावतीसाठी केवळ अडीच हजार टन बियाणे

सध्या राज्यभर खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. काही भागामध्ये पावसाने हजेरी लावल्याने खत- बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सुरवातही केली आहे. असे असताना अमरावती जिल्ह्याला मागणीच्या तुलनेत नगण्य पुरवठा झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारचा उद्देश हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा आहे की कमी करण्याचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदाच्या वर्षासाठी केवळ 2 हजार 500 टन बियाणांचा पुरवठा झाला आहे. भाजपा सत्तेत असताना मात्र, 50 ते 60 हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा केला जात असल्याचे आ.रवी राणा यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय

महाबीजकडून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरुपात बियाणे उपलब्ध होते.त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा पैसा खर्च करावा लागत नाही. मात्र, या कंपनीचे खच्चीकरण करुन इतर खासगी कंपन्यांना वाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकच्या रकमेने बियाणे खरेदी करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसून अन्यायकारक असल्याचा घणाघातही आ. रवी राणा यांनी केला आहे. जिल्ह्यात झालेल्या बियाणांच्या पुरवठ्यावरुन ते बोलत होते.

हे सुद्धा वाचा

बियाणांच्या किंमतीमध्ये वाढ

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. असे असताना शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतकरी अडचणीत असतानाच बियाणांच्या किंमतीमध्ये चार पटीने वाढ केली आहे. त्यामुळे पेरणी करणेही अवघड झाले असून शेतकऱ्यांबद्दलही या सरकारच्या मनात सहानभुती राहिली नसल्याचा आरोप आ. राणा यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.