FPO : शेतकरी उत्पादक कंपन्यांवर अणखी एक जबाबदारी, शेतकऱ्यांची सोय अन् योग्य दरही

शेतीमालाला किमान दर मिळावा म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव केंद्र उभारली जात आहेत. या माध्यमातून योग्य दर तर मिळत आहे पण स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून आता नवा पर्याय खुला करण्यात आला आहे. आतापर्यंत शेती उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीमालाची खरेदी केली जात नव्हती पण यंदाच्या खरीप हंगामापासून उत्पादक कंपन्या देखील हमीभावाने हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे.

FPO : शेतकरी उत्पादक कंपन्यांवर अणखी एक जबाबदारी, शेतकऱ्यांची सोय अन् योग्य दरही
शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून यंदा हरभऱ्याचीही खरेदी होणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 5:05 AM

औरंगाबाद : शेतीमालाला किमान दर मिळावा म्हणून (Central Government) केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव केंद्र उभारली जात आहेत. या माध्यमातून योग्य दर तर मिळत आहे पण स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून आता नवा पर्याय खुला करण्यात आला आहे. आतापर्यंत (FPO) शेती उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून (Purchase of agricultural goods) शेतीमालाची खरेदी केली जात नव्हती पण यंदाच्या खरीप हंगामापासून उत्पादक कंपन्या देखील हमीभावाने हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे. हरभऱ्याला केंद्र सरकारने 5 हजार 230 z रुपये दर ठरवून देण्यात आला आहे. त्याच दराप्रमाणे हरभऱ्याची खरेदी ही शेतकरी उत्पादक कंपन्या करणार आहेत. याची सुरवात मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यापासून करण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यात 21 ठिकाणी खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. स्थानिक पातळीवर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून बाजारपेठ उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सोय

आता पणन महासंघाच्या माध्यमातून उभी राहणारी खरेदी केंद्र ही तालुक्याच्या किंवा मंडळाच्या ठिकाणी होती. त्यामुळे वाहतूक आणि इतर खर्च करुन शेतकऱ्यांना शेतीमाल दाखल करावा लागत होता. पण आता शेतकरी उत्पादक कंपन्याही खरेदी केंद्राच्या माध्यमातून हरभऱ्याची खरेदी करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची गाव ठिकाणीच सोय होणार आहे. हरभऱ्याला जागेवरच 5 हजार 230 रुपये दर मिळणार आहे.

नोंदणी प्रक्रिया सुरु, या कागदपत्रांची करावी लागणार पूर्तता

खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री करायची असल्यास शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. याकरिता चालू हंगामातील हरभऱ्याचा पीक पेरा, नोंद असलेला सातबारा, होल्डींग सातबारा, आधार कार्ड, बॅंक खात्याचा तपशील ही माहिती अदा करावी लागणार आहे. यानंतरच शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करता येणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही खरेदी केंद्र

‘नाफेड’च्यावतीने सुरु करण्यात आलेली खरेदी केंद्र ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी उभी केली जाणार आहेत. 15 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत नोंदणी आणि त्यानंतर थेट विक्री होणार आहे. यंदा रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा विक्रमी क्षेत्रावर झालेला आहे. शिवाय हमीभावापेक्षा खुल्या बाजारात दर कमी असल्याने या खरेदी केंद्राचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

संबंधित बातम्या :

Grape : द्राक्ष खरेदीतून शेतकऱ्यांची फसवणूक, व्यवहार करताना नेमकी काय काळजी घ्यावी?

Agricultural Scheme : शेतकऱ्यांचे योजनांसाठी अर्ज, मात्र निवड होते कशी? वाचा सविस्तर

शेतीच्या जोडव्यवसयांना सरकारचे पाठबळ, पायाभूत सुविधा अन् योजनांचाही मिळणार लाभ

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.