AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशा प्रकारे करा बटाट्याची लागवड, कमी किंमतीत कराल दुप्पट कमाई, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

बटाट्याचे 200हून अधिक प्रकार आहेत. यात कुफरी ज्योती, कुफरी बहार, कुफरी पुखराज, कुफरी अशोक, कुफरी चंद्रमुखी, कुफरी बादशाह, कुफरी सिंदुरी, कुफरी कांचन, कुफरी स्वर्ण या वाणांचा समावेश आहे. (This is how to plant potatoes, you'll earn twice as much at a lower price)

अशा प्रकारे करा बटाट्याची लागवड, कमी किंमतीत कराल दुप्पट कमाई, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
चमकदार त्वचेसाठी बटाट्यापासून बनवलेला फेस मास्क वापरा
| Edited By: | Updated on: Apr 05, 2021 | 9:50 AM
Share

नवी दिल्ली : बटाटा ही एक अशी भाजी आहे, जी प्रत्येक भाजीचा आधार मानली जाते आणि म्हणूनच बटाटा जगातील चौथी महत्वाची भाजी मानली जाते. मका, धान आणि गहू नंतर सर्वाधिक लागवड बट्याट्याची केली जाते आणि त्यातही भरपूर उत्पादन होते. बरेच शेतकरी बटाट्यांमधून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. या शेतीत काही खास गोष्टींची काळजी घेतली तर शेतकरी बांधवांचे उत्पन्न लक्षणीय वाढू शकते. बाजारात बटाट्याल अधिक मागणी आहे. (This is how to plant potatoes, you’ll earn twice as much at a lower price)

बटाटा पिकाबाबत काय आहेत शक्यता?

गेल्या 9 महिन्यांत भाज्यांच्या निर्यातीत 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्ष 2019-20 मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 15,98,628 टन भाजीपाला निर्यात करण्यात आला, तर 2020-21 मध्ये एप्रिल ते डिसेंबर दरम्यान 18,82,068 टन भाज्यांची निर्यात झाली आहे. यावर्षी बटाट्याच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ होऊ शकते. बटाट्याच्या किंमतींनाही याचा फटका बसत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यावर नजर टाकल्यास राजकोटमधील बटाटे 825 रुपयांच्या आसपास विकले गेले, तर सुरतमध्ये ते 850 रुपये होते. त्याचवेळी राजस्थानमध्ये बटाटे 660 रुपयांपर्यंत विकले गेले आणि राजस्थानच्या बऱ्याच मंडईमध्ये बटाटा भाव कमी होता. उत्तर प्रदेशमध्येही बटाटे सुमारे 650 रुपयांना विकले गेले. परंतु असा विश्वास आहे की यावेळी बटाट्याचे उत्पादन सर्वाधिक असू शकते आणि यामुळे बटाट्याचे दर अधिक वाढणार नाहीत. कोल्ड स्टोरेजमध्येही बराच बटाटा आहे.

शेती कशी वाढवायची?

बटाटा लागवडीमध्ये माती पेरण्यापासून बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. गुळगुळीत आणि चिकणमाती मातीमध्ये बटाटा चांगला वाढतो. तसेच, सेंद्रिय पदार्थांसह वाळूमय मातीत बटाट्यांचे उत्कृष्ट उत्पादन मिळू शकते. यासह, शेतकऱ्यांनी आपल्या प्रदेशाच्या हवामानाच्या आधारे सुधारित वाणांची निवड करावी. तसे बटाट्याचे 200हून अधिक प्रकार आहेत. यात कुफरी ज्योती, कुफरी बहार, कुफरी पुखराज, कुफरी अशोक, कुफरी चंद्रमुखी, कुफरी बादशाह, कुफरी सिंदुरी, कुफरी कांचन, कुफरी स्वर्ण या वाणांचा समावेश आहे.

वेळेवर पेरणी करणे आवश्यक

चांगल्या उत्पादनासाठी वेळेवर पेरणी करणे आवश्यक आहे आणि यावेळी तापमान 30 अंशांच्या आसपास असणे आवश्यक आहे. तसेच पेरणी 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान करावी. याशिवाय ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उशीरा पेरणी करावी. पेरणी करताना दोन रोपांमधील अंतर 20 सेमीपर्यंत ठेवावे आणि दोन रांगांमधील अंतर 60 सेमीपर्यंत ठेवा. आपण बटाटाच्या आकारानुसार यात बदल करु शकता आणि ते 8 सेमीपर्यंत रोपांची लागवड करा. याशिवाय सिंचनाची विशेष काळजी घेऊन आपण चांगले उत्पादन घेऊ शकता. (This is how to plant potatoes, you’ll earn twice as much at a lower price)

इतर बातम्या

टरबूज, खरबुजाची शेती, 70 दिवसात 8 लाख कमवले; वाचा जिगरबाज शेतकरी दाम्पत्याची कहाणी

‘शुगर फ्री पेरु’ची शेती ठरतेय वरदान, मराठवाड्यात दुष्काळी भागात शेतकऱ्याला लाखोंचा फायदा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.