कोल्हापुरातील गावांमध्ये टस्कर हत्तींचा धुमाकूळ, पिकांचं नुकसान, ग्रामस्थांमध्ये घबराट

टस्कर हत्तींचा नागरिकांना होणारा उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. हत्तीचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

कोल्हापुरातील गावांमध्ये टस्कर हत्तींचा धुमाकूळ, पिकांचं नुकसान, ग्रामस्थांमध्ये घबराट
टस्कर हत्ती सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 12:36 PM

कोल्हापूर: जिल्ह्याला वनसंपदा मोठ्या प्रमाणात लाभल्यानं जगंली प्राण्यांची संख्या देखील मोठी आहे. कोल्हापूरच्या आजरा आणि चंदगडमधील अनेक गावांना देखील याचा त्रास होत असतो. आजरा आणि चंदगड परिसरातील अनेक गावांमध्ये टस्कर हत्तींचा धुमाकूळ होत असल्याचं वारंवार समोर येते. आजरा तालुक्यातील हाळोली आणि माद्याळ या गावात नुकताच हत्तींचा मुक्त संचार आढळला आहे. (Tusker Elephant harm crops in Haloli and Madyal village of Ajara in Kolhapur)

आजरा तालुक्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ

टस्कर हत्तींचा नागरिकांना होणारा उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. हत्तीचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आजरा तालुक्यातील हाळोली,माद्याळ या गावात हत्तीचा संचार सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळाला आहे. टस्कर हत्तींकडून हाळोली आणि माद्याळ गावातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.

ऊसासह अनेक पिकांच प्रचंड नुकसान

टस्कर हत्तींचा उपद्रव ज्यावेळी वाढतो त्यावेळी आजरा आणि चंदगड तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं असल्याचं दिसून येते. हाळोली आणि माद्याळ गावातील ऊसासह अनेक पिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. टस्कर हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

टस्कर हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी

हाळोली आणि माद्याळ गावातील ग्रामस्थांनी टस्कर हत्तींपासून होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. टस्कर हत्तींचा बंदोबस्त व्हावा म्हणून हाळोली आणि माद्याळ गावातील ग्रामस्थ वनविभागाकडं मागणी करत आहेत. मात्र, वनविभाग त्याकडे लक्ष देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मानवी वस्तीत हत्ती आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट

आजरा आणि चंदगडमधील अनेक गावांमध्ये टस्कर हत्ती आणि अन्य वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण दिसून आलं आहे. हाळोली आणि माद्याळ गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये टस्कर हत्ती सीसीटीव्हीमध्ये आढळल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा

कोरोना पॉझिटिव्हीची रेटमध्ये राज्यात पहिल्या स्थानावर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला आता दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16 वरून आला 12 टक्‍क्‍यांवर आला आहे. चाचण्या वाढवून ही रुग्ण संख्येत वाढ नसल्याचं दिलासादायक चित्र दिसून आलं आहे. गृहविलगीकरण प्रमाण कमी केल्याचाही परिणाम यानिमित्तानं दिसून आला आहे. जिल्ह्यातील 127 गावे कोरोनामुक्त झाली आहेत.

इतर बातम्या:

पंकजा मुंडेंचे पंख छाटले, खडसेंना बाद केलं, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं; शिवसेनेची टीका

(Tusker Elephant harm crops in Haloli and Madyal village of Ajara in Kolhapur)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.