AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळं 702 घरांची पडझड, 4 व्यक्तीचा मृत्यू, 58 जनावरं दगावली

पावसामुळे कांदा, आंबा व भाजीपाला तसेच फळबागांचे नुकसान झाले, तर जनावरांचा चाराही भिजल्याने पुढील काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळं 702 घरांची पडझड, 4 व्यक्तीचा मृत्यू, 58 जनावरं दगावली
unseasonal rainImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 06, 2023 | 1:41 PM
Share

भंडारा : जिल्ह्यात महिनाभरापासून तसा अवकाळी पावसाचा (unseasonal rain) कहर सुरू आहे. दरम्यान 1 ते 3 मे या तीन दिवसांच्या कालावधीत वादळ व पावसाची तीव्रता अधिक जाणवल्याने प्रशासनाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात 702 घरांची पडझड झाली. तर लाखनी तालुक्यात 390.2 हेक्टरमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान लाखांदूर (lakhandur) तालुक्यालाही या काळात मोठा फटका बसला असून तेथील पीक नुकसानाची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून अवकाळी पावसाच्या (Agricultural news) संततधारेने पिकांचे मोठे नुकसान झाले. लाखनी व लाखांदूर वादळी पावसाने थैमान घातले. रस्त्यावर झाडे कोसळली, विजेचे खांब कोसळले. घरावरील कौलारू छप्पर उडाले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

अनेक गावं अंधारात आहेत, नापिकीची झळा सोसणाऱ्या या पावसाने शेतकरी ‘गार’ झाला आहे. सततच्या नापिकीला तोंड देत थकला आहे. सरकारने सावरण्यासाठी मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने उन्हाळी धान, मक्याचे पीक पुर्णपणे उद्ध्वस्त झाले. यंदा उन्हाळ्यात मार्चपासून अधून-मधून पाऊस सुरू आहे. खरीपनंतर रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान होत आहे. अवकाळी पावसाचा मुक्काम आता 7 मे पर्यंत लांबणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

अवकाळी पावसाने 4 व्यक्तीचा मृत्यू, तर 58 जनावर दगावली

संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात देखील गेल्या दीड-दोन महिन्यापासून विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकासह, फळ बागेचे मोठे नुकसान झाले आहे. मनुष्यहानी व पशु आणि देखील मोठ्या प्रमाणात झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मार्च ते एप्रिल 2023 या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात 4 जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे. तर 58 विविध जनावरांचा देखील मृत्यू झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानी झालेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, नायब तहसीलदार, संजय बंगाळे यांनी सांगितलं.

अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात सुमारे दीड तास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसामुळे कांदा, आंबा व भाजीपाला तसेच फळबागांचे नुकसान झाले, तर जनावरांचा चाराही भिजल्याने पुढील काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

पिकवलेल्या हळदीच्या पिकांचे देखील या पावसाने जबर नुकसान झालंय

नांदेडमध्ये गेल्या दहा दिवसापासून सातत्याने पाऊस पडत आहे, वादळी वारे गारपीट आणि पाऊस अश्या तिहेरी संकटामुळे सगळ्याच प्रकारचा भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकाच्या उत्पादनातून घरखर्च भागवण्याचे स्वप्न शेतकऱ्यांचे धुळीला मिळाले आहे. त्यासोबतच वर्षभर मेहनत करून पिकवलेल्या हळदीच्या पिकांचे देखील या पावसाने जबर नुकसान झालंय, उकडून वाळायला ठेवलेली हळदीला उन्हाऐवजी पावसाचा सामना करावा लागलाय. त्यातून हळदीच्या पिकांचे देखील मोठे नुकसान झालेय. मात्र आता झालेल्या या नुकसानीचे अद्याप पंचनामे देखील पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे शेतकरी हतबल बनलाय.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.