AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Defog Car Windshield : सोपा उपाय, यामुळे कमी होईल कारच्या काचेवरचा फॉग

Defog Car Windshield : पावसाळ्यात, हिवाळ्यात वाहनधारकांना एक समस्या जीवाला घोर लावते. विंडशील्डवर वाफ जमा होते. त्यामुळे कार चालताना अचडण येते. कारच्या काचेवरील फॉग या सोप्या उपायांनी कमी होतो.

Defog Car Windshield : सोपा उपाय, यामुळे कमी होईल कारच्या काचेवरचा फॉग
| Updated on: Aug 19, 2023 | 11:38 AM
Share

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : पावसाळा असो वा हिवाळा, कार चालविताना फॉगची (Fog On Windshield) समस्या अनेकांना सतावते. काही जण तर या फॉगमुळे जाम वैतागतात. बाहेरील फॉग वायफरने तर दूर होतो. कारमध्ये एसी सुरु असताना बाहेरील तापमान आणि कारमधील कारमधील तापमानात मोठी तफावत होते आणि मग कारच्या काचेवर वाफ तयार होते. समोरच्या काचेवरील बाहेरील वाफ वायफरच्या मदतीने कमी होते. पण खरी समस्या आतील वाफेची असते. ती दूर करताना कार चालकाचे लक्ष विचलीत होते. वाफेमुळे कार चालविताना समोरचे व्यवस्थित दिसत नसल्याने अपघाताची भीती असते. काचेवरील आतील वाफ साफ करण्यासाठी सतत कपड्याचा वापर करावा लागतो. पण त्यापेक्षा हा उपाय केल्यास कारच्या काचेवरचा फॉग झटक्यात दूर होईल.

AC तापमान वाढवा

कारमधील AC चे तापमान वाढवा. त्यामुळे कारच्या काचेवरील वाफ कमी होईल. कारचे तापमान आतून वाढल्यास काचेवरील वाफ आपोआप कमी होईल. त्यासाठी कारमधील एसीतील हिट वाढवा. डिफॉगिंसाठी नॉब रेड इंडिकेटरकडे फिरवा. कारच्या काचेवरील वाफ कमी करण्यासाठी ही सर्वात चांगली पद्धत आहे. त्यामुळे आद्रता कमी होईल.

खिडकी किंचित उघडा

वातावरणातील आद्रता अधिक असेल आणि कारमधील आद्रता कमी असेल तर आतून वाफ तयार होते. त्यामुळे कारची खिंडकी किंचित खाली केल्यास वाफ तयार होण्याची समस्या कमी होईल. काचेवरील वाफ कमी होईल. कारच्या चारही खिडक्या किंचित उघड्या केल्यास काचेवर वाफ तयार होणार नाही. बाहेरील हवा आता आल्यानंतर तापमान सारखे राहिल आणि काचेवर वाफ तयार होत नाही.

Car Engine चा वापर

कारचे इंजिन पण काचेवरील वाफ कमी करण्यासाठी उपयोगी पडते. कार चालविताना इंजिन गरम होते. कार दुरचा पल्ला गाठते, त्यावेळी अधिक काळ इंजिन गरम असते. इंजिन 90 डिग्री सेल्सिअस वर पोहचल्यावर विंडशील्डवरील वाफ हळूहळू कमी होते. पण त्यासाठी तुम्हाला विंडशील्डवरील वायफरचा पण वापर करावा लागतो.

वायफर ब्लेडचा वापर

पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात कारची सर्व्हिंसग जरुर करा. त्यात योग्य आणि चांगल्या दर्जाचे वायफर ब्लेड वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे पाऊस सुरु असताना तुमच्या कारची विंडशील्ड व्यवस्थित साफ होईल. त्यामुळे काचेवरील धुकं, वाफ कमी होईल.

डीफॉग बटणचा उपयोग

सर्व उपाय करुनही काचेवरील वाफ कमी होत नसेल. तर कार रस्त्याच्या कडेला घ्या. कारमधील डीफॉग बटण सुरु करा. कारचे ब्लोअर सुरु ठेवा. त्यामुळे कारच्या काचेवरील धुके गायब होईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.