स्टेअरिंग फेल होण्याआधी मिळतात हे पाच संकेत, अनेक जण करतात या चूका
वाहन चालवताना (Driving Tips) तुम्हाला तुमच्या जिवाबरोबरच इतरांच्या जीवाचीही काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत एखादी चूक तुमचा आणि इतरांचाही जीव धोक्यात आणू शकते.

अनेकवेळा गाडी चालवत असताना अचानक स्टेअरिंग बिघडते, त्यामुळे चालक घाबरतो. पण, आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या वाहनाचे स्टेअरिंग बिघडण्यापूर्वीच कळेल आणि तुम्ही त्यावर सहज नियंत्रण ठेवू शकाल. कारमध्ये स्टिअरिंग निकामी होण्यापूर्वी, तुमच्या कारच्या स्टिअरिंगमध्ये काही समस्या असल्याची काही संकेत तुम्हाला मिळतात.
हे लक्षणे जाणवल्यास लगेच व्हा सावध
- वाहन वळवताना आवाज येत असेल तर ते स्टेअरिंग बिघडल्याचे लक्षण आहे.
- वाहन सुरू करताना हुडखालून आवाज आला तर स्टीयरिंग व्हील योग्य स्थितीत नाही हे समजून घ्या. हे देखील एक स्टेअरिंग बिघडल्याचे लक्षण आहे.
- जर स्टीयरिंगमध्ये जोरदार कंपन असेल तर हे चिन्ह देखील स्टीयरिंग बिघाड दर्शवते.
- तुम्ही स्टीयरिंग फिरवताना, जर तुम्हाला ज्या दिशेने वळायचे आहे त्या दिशेने चाक वळले नाही, तर हे देखील बिघाडाचे लक्षण आहे. हे सूचित करते की स्टीयरिंगमधील द्रव पातळी कमी झाली आहे.
- वाहनाचा पॉवर स्टीयरिंग फ्लुइड लाल रंगाचा असतो आणि त्यातून एक विचित्र वास येतो. तेल जुने झाले तर त्याचा रंग काळा होतो. त्यामुळे द्रवाचा रंग लाल राहील याची खात्री करावी लागेल. जर तुम्ही याकडे लक्ष देत नसाल तर हे धोक्याचे लक्षण आहे.
भारतात कारचे स्टेअरिंग उजव्या बाजूला का असते?
रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहन चालवणं अधिक सुरक्षित आहे ही कल्पना बरेच लोकं उजव्या हाताने चालतात या गृहितकावर आधारित आहे. अशा परिस्थितीत रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडीवर नियंत्रण ठेवणं त्यांना सोपं जातं. असाही एक विश्वास आहे की उजवीकडे वाहन चालवल्याने चालकांना समोरून येणाऱ्या गाड्या अधिक चांगल्या प्रकारे दिसतात, त्यामुळे समोरासमोर वाहनं धडकण्याचा धोका कमी होतो.
भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात गाड्या
इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेले सर्व देश रस्त्याच्या उजव्या बाजूनेच गाड्या चालवतात असं नाही. आयर्लंड, माल्टा आणि भारतदेखील एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याचा भाग होते. असं असूनही, या देशांमध्ये ड्रायव्हिंग रस्त्याच्या डाव्या बाजूने केले जाते, म्हणजेच या देशांमध्ये स्टिअरिंग व्हील उजव्या बाजूला आहे. याचे कारण ड्रायव्हिंगच्या जुन्या सवयी, स्विचिंगचा खर्च, गैरसोय आणि ड्रायव्हर्सना पुन्हा प्रशिक्षण देण्यात अडचण, या गोष्टी आहेत.
