शानदार फीचर्ससह Hero Xpulse 200T चं BS6 व्हर्जन लाँच, किंमत…

हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) आपल्या एक्सपल्स 200 टी (Xpulse 200T) मोटारसायकलचं बीएस 6 व्हर्जन भारतात लॉन्च केलं आहे.

शानदार फीचर्ससह Hero Xpulse 200T चं BS6 व्हर्जन लाँच, किंमत...
Hero Xpulse 200T BS6
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 12:48 PM

मुंबई : भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) आपल्या एक्सपल्स 200 टी (Xpulse 200T) मोटारसायकलचं बीएस 6 व्हर्जन भारतात लॉन्च केलं आहे. नवी Hero Xpulse 200T बीएस 6 ची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 1,12,800 रुपये आहे. बीएस 4 मॉडेलच्या तुलनेत अपडेटेड बीएस 6 मॉडेलची किंमत 17,300 रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत बीएस 4 मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 95,500 रुपये होती. Hero Xpulse 200T बाईक Xpulse रेंजचाच पुढचा भाग आहे. हिरोने नवीन 2021 Hero Xpulse 200T तीन कलर ऑप्शन्ससह सादर केली आहे. यामध्ये मॅट शिल्ड गोल्ड, पँथर ब्लॅक आणि स्पोर्ट्स रेड कलर स्कीमचा समावेश आहे. (Hero launches BS-6 version of XPulse 200T motorcycle in India with news features)

नवीन अपडेटेड हिरो Xpulse 200T मोटारसायकलमध्ये 199.6 सीसी, ऑईल-कूल्ड, सिंगल-सिलिंडर, इंधन-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. 5-स्पीड गिअरबॉक्ससह येणारे हे इंजिन 18.1bhp 8,500 आरपीएम पॉवर आणि 6,500 आरपीएम वर 16.15Nm टॉर्क जनरेत करतं. नवीन अपडेटेड बाइकचे मेकॅनिकल स्पेसिफिकेशन्स बदलले आहेत. परंतु स्टाईल आणि लुक या आधीच्या बीएस 4 व्हर्जनप्रमाणेच आहे.

फीचर्स

XPulse 200T BS6 एलईडी हेडलाइट आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशनसह ब्लूटूथ-कनेक्टेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारख्या वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे. बाईकच्या सस्पेन्शनबद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये पुढच्या बाजूला पारंपारिक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस सात-स्टेप अॅडजस्टेबल रियर मोनो शॉक दिले आहेत. दोन्ही चाकांवर ब्रेकसाठी डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत. मोटारसायकलमध्ये 276 मिमी अपफ्रंट आणि 220 मिमी रियर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यामध्ये स्टँडर्ड सिंगल-चॅनेल एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) देखील देण्यात आली आहे.

मोटरसायकलचा ग्राउंड क्लीयरन्स 177 मिमी इतका आहे आणि इंधन टाकीची क्षमता 13 लीटर इतकी आहे. 2021 Hero Xpulse 200T मध्ये फुल एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लॅम्प, 17-इंच ब्लॅक अ‍ॅलोय व्हील्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

2021 Apache RTR 160 4V भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Royal Enfield 650 cruiser ची रोड टेस्ट सुरु, लवकरच लाँच होणार, जाणून घ्या किंमत फीचर्स

बंपर ऑफर! 1.45 लाखांची बाईक अवघ्या 45 हजारात

(Hero launches BS-6 version of XPulse 200T motorcycle in India with news features)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.