Honda च्या ‘या’ शानदार बाईकमध्ये आढळला दोष; कंपनीने गाड्या परत मागवल्या

Honda Motorcycle and Scooter India (HMSI) नुकतीच माहिती दिली आहे की, कंपनी H’ness CB350 चे काही युनिट्स परत मागवणार आहे.

Honda च्या ‘या’ शानदार बाईकमध्ये आढळला दोष; कंपनीने गाड्या परत मागवल्या
Honda H’ness CB350
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 10:59 AM

मुंबई : Honda Motorcycle and Scooter India (HMSI) नुकतीच माहिती दिली आहे की, कंपनी H’ness CB350 चे काही युनिट्स परत मागवणार आहे. जेणेकरुन काही फॉल्टी ट्रान्समिशन पार्ट दुरुस्त केले जाऊ शकतील अथवा बदलता येतील. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरदरम्यान बनवण्यात आलेले सर्व मॉडल्स कंपनी परत मागवणार आहे. (Honda recalls certain number of H’ness CB350 bikes)

होंडाने ट्रान्समिशनच्या चौथ्या गीयरच्या काउंटर शाफ्टमध्ये सेकंड मटेरियल ग्रेडचा वापर ओळखला आहे, जो बाईक बराच वेळ चालवल्यास बाइकचे नुकसान करू शकतो. मात्र, असे कोणतेही प्रकरण अद्याप समोर आले नसल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

H’ness CB350 च्या या रिकॉल अभियानाची सुरुवात 23 मार्चपासून केली जाणार आहे. वॉरंटी असूनही सावधगिरी म्हणून कंपनी ही प्रक्रिया राबवत आहे. HMSI ने सांगितले आहे की, कंपनीचं हे स्वैच्छिक पाऊल आहे. केवळ ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास कायम राहावा, या उद्देशांने कंपनीने हे पाऊल उचललं आहे.

HMSI ने म्हटले आहे की, कंपनी शुक्रवारपासून वाहन तपासणीसाठी कॉल, ई-मेल, एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना माहिती देईल. तथापि, किती बाईक परत मागवल्या जाणार आहेत हे कंपनीने अद्याप स्प्ष्ट केलेले नाही.

होंडा हायनेस सीबी 350 ने आधुनिक-क्लासिक डिझाइन, प्रगत वैशिष्ट्ये, रिफाइन्मेंट आणि बिल्ट क्वालिटीसाठी ग्राहकांकडून भरभरुन प्रशंसा मिळविली आहे. लोकांना ही बाईक खूप आवडली आहे. त्यामुळेच कंपनीने अल्पावधितच या बाईकचे 10,000 युनिट्स विकण्याचा रेकॉर्ड केला आहे. कंपनी सध्या बुक करण्यात आलेल्या बाईक लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. होंडा हायनेस CB350 चा वेटिंग टाईम कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु आहोत. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी त्यांच्या BigWing नेटवर्कचा इतर शहरांमध्येही विस्तार करीत आहेत.

जबरदस्त इंजिन

या बाईकच्या DLX व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 1.85 लाख रुपये इतकी आहे. तर या बाईकच्या DLX Pro व्हेरिएंटची किंमत 1.90 लाख रुपये आहे. हायनेस-सीबी 350 या बाईकमध्ये एक 350 सीसीचं पॉवरफुल 4 स्ट्रोक एअरकुल्ड, ओएचसी सिंगल-सिलेंडर आहे. त्यामध्ये पीजीएम-एफआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये पुढे आणि मागे अधिक व्हिजिबिलिटीसाठी एलईडी सेटअप आहे. सोबतच बाईकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस आणि 15 लीटरचा फ्युल टॅन्क आहे.

सीबी ब्रॅण्डचा मोठा इतिहास

होंडाच्या सीबी ब्रॅण्डचा (सिरीजचा) एक मोठा इतिहास आहे. 1952 मध्ये त्याची सुरुवात करण्यात आली होती. सीबी 92 ही या सिरीजमधली पहिली बाईक होती. एच नेस-सीबी 350 ही बाईक हा इतिहास पुढे नेत आहे.

इतर बातम्या

2021 Apache RTR 160 4V भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Royal Enfield 650 cruiser ची रोड टेस्ट सुरु, लवकरच लाँच होणार, जाणून घ्या किंमत फीचर्स

बंपर ऑफर! 1.45 लाखांची बाईक अवघ्या 45 हजारात

(Honda recalls certain number of H’ness CB350 bikes)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.