कोरोना संकटकाळातही ऑटोमोबाईल क्षेत्र मालामाल, भारताची ‘या’ देशात विक्रमी निर्यात

दक्षिण आफ्रिकेत 2020 मध्ये कोव्हिड-19 चं संकट असूनही, त्यांनी मोठ्या प्रमाणात भारतातून वाहने आयात केली आहेत.

कोरोना संकटकाळातही ऑटोमोबाईल क्षेत्र मालामाल, भारताची 'या' देशात विक्रमी निर्यात
Cars

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेत 2020 मध्ये कोव्हिड-19 चं संकट असूनही, त्यांनी मोठ्या प्रमाणात भारतातून वाहने आयात केली आहेत. वाहन उद्योगाबाबतच्या नुकत्याच आलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वाहन बाजारपेठेच्या व्यासपीठावरील ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री एक्सपोर्ट काऊन्सिलच्या ऑटोमोटिव्ह एक्सपोर्ट मॅन्युअल अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. (India topped 2020 vehicle imports into South Africa despite Covid-19 impact)

अहवालात म्हटले आहे की, जगातील अनेक नामांकित वाहन उत्पादकांनी भारताला एंट्री ग्रेड आणि छोट्या वाहनांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र बनवले आहे. भारतातून दक्षिण आफ्रिकेत आयात करण्यात आलेली बहुतांश वाहने याच श्रेणीतील आहेत.

या श्रेणीतील फोक्सवॅगनची छोटी कार पोलो (Polo) ही एकमेव अशी कार आहे, ज्या कारची निर्मिती दक्षिण आफ्रिकेत केली जात होती. या अहवालानुसार 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतातून 87,953 वाहनं आयात केली आहेत. आयात करण्यात आलेल्या एकूण प्रवासी कार आणि हलक्या व्यावसायिक वाहनांचे प्रमाण 43.2 टक्के इतकं होतं. परंतु या काळात या श्रेणीतील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 10 ब्रँड्सपैकी 9 ब्रँड्स हे स्थानिय रुपात विनिर्मित ब्रँड्सची वाहने होती.

दक्षिण आफ्रिकन नागरिकांना पिकअप वाहने चालवायला आवडतात. यामध्ये दोन्ही प्रकारच्या वाहनांची सुविधा आहे, त्यात व्यावसायिक आणि दूरस्थ सहलीसाठी उपयुक्त अशा वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका भारताकडून मोठ्या प्रमाणात पिकअप वाहने आणि छोट्या कार्सची आयात करतो.

महिंद्राचे (दक्षिण आफ्रिका) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुप्ता म्हणाले की, ही चांगली बातमी आहे. ते म्हणाले, “भारत-दक्षिण आफ्रिका संबंध दिवसेंदिवस अधिक बहरत आहेत. केवळ दोन देशांमधील परस्पर व्यापारच वाढत नाही तर दक्षिण आफ्रिका हा देश आफ्रिका खंडातील अन्य बाजारांमधील भारतीय वस्तूंसाठीचं प्रवेशद्वार म्हणून उदयास येत आहे. स्थानिक बाजारात तीन वर्षांपासून सर्वाधिक वेगाने विक्री करणार्‍या वाहनांमध्ये महिंद्राची पिकअप वाहने आघाडीवर आहेत.

इतर बातम्या

कोरोना काळातही Maruti Suzuki चा बाजारात धुमाकूळ, एप्रिलमध्ये रेकॉर्डब्रेक विक्री

देशात कोरोनाची दुसरी लाट, तरीही Bajaj ची घोडदौड सुरुच, एप्रिलमध्ये 3.88 लाख गाड्यांची विक्री

ऑक्सिजन कंटेनर आणि टँकर्सवर GPS Tracking Device बसवणं अनिवार्य, केंद्राचा मोठा निर्णय

(India topped 2020 vehicle imports into South Africa despite Covid-19 impact)