Kia India : किआ इंडियानं 3 वर्षांच्या कालावधीत 5 लाख विक्रीचा टप्पा गाठला, सर्वात जलद कार निर्माती कंपनी

कॅरेन्स हे त्याच्या श्रेणीतील दुसरे सर्वाधिक विकले जाणारे वाहन बनले आहे. कार्निव्हलने देखील आपला मजबूत विक्रीचा ट्रेंड कायम ठेवला असून दर महिन्याला सरासरी 400 वाहने विकली जात आहेत .

Kia India : किआ इंडियानं 3 वर्षांच्या कालावधीत 5 लाख विक्रीचा टप्पा गाठला, सर्वात जलद कार निर्माती कंपनी
किआ इंडियाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 12:41 PM

मुंबई : देशातील सर्वात जलद वाढ होणारी एकमेव कार निर्माती किआ इंडियाने (Kia India) आणखीन एक टप्पा गाठला आहे तो म्हणजे उच्चांक प्राप्त करण्यासाठी केवळ 3 कार्यात्मक वर्षांमध्ये 5,00,000 देशातील विक्री पार करून सर्वात जलद कार (Car) निर्माती बनली आहे. निर्यात सहित, किआ इंडियाचे एकत्रीत डिस्पॅच तीच्या अनंतपूर निर्माती सुविधेमधून 6,34,224 नग एवढी झाली आहे. कॅरेन्सच्या उत्तम सादरीकरणामुळे, कंपनीने केवळ 4.5 महिन्यात 1 लाखांची विक्री ( सुरक्षित केली आहे. भारतीय बाजारांमधील तीच्या बळकट सादरीकरणासह, कंपनीने आता किआ कॉरपोरेशनच्या जागतील विक्रीच्या (Sales) 6% पेक्षा जास्त सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, वर्ष 22 मध्ये, कॅरेन्स हे त्याच्या श्रेणीतील दुसरे सर्वाधिक विकले जाणारे वाहन बनले आहे. कार्निव्हलने देखील आपला मजबूत विक्रीचा ट्रेंड कायम ठेवला असून दर महिन्याला सरासरी 400 वाहने विकली जातात.

किआ इंडियाचे भारतासाठी अग्रेसर मॉडेल, सेल्टॉस, कंपनीच्या एकूण विक्रीचे नेतृत्व करत आहे. किआ इंडिया च्या एकूण वित्त व्यवस्थेमध्ये मॉडेलचा 59% वाटा असतो, त्यानंतर सोनेटचा 32% पेक्षा जास्त आहे. चार्टवर झपाट्याने वाढ होत असताना, केरेन्सने लॉन्च झाल्यापासून केवळ 5 महिन्यांत कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत जवळपास 6.5% योगदान दिले आहे. किआ कार्यरत असलेल्या सेगमेंटमध्ये येत असताना, सेल्टोसने मध्यम-एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली जागा आहे, त्याच्या श्रेणीतील वाहनांच्या विक्रीमध्ये 40% पेक्षा जास्त योगदान दिले आहे. सोनेट 15% शेअरसह कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्‍ये आपले चांगले स्थान निर्माण करत असताना, कॅरेन्स त्‍याच्‍या सेगमेंटमध्‍ये 18% पेक्षा जास्त योगदान देऊन चार्टवर वाढ करत आहे.

हायलाईट्स

  1. किआ इंडियाने 3 वर्षांच्या कमी कालावधीत 5 लाख विक्रीचा टप्पा पार केला
  2. कॅरेन्स ने 4.5 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एक लाखाचा टप्पा गाठला
  3. हे सुद्धा वाचा
  4. • या क्षेत्रात प्राप्ती करणारी सर्वात जलद कार निर्माती बनली (हेडलाईन 2, 3 आणि 5 मध्ये)
  5. • कॅरेन्सच्या सुरूवातीपासून 30,953 नग विक्री करून केवळ 4.5 महिन्यांत सर्वात जलद 1 लाखांची विक्री करून कॅरेन्सने KIN ला पुढे नेले
  6. • किआ इंडियाने आता किआच्या जागतिक विक्रीत 6% चा सहभाग घेतला
  7. • कंपनीची एकूणच वित्तव्यवस्था बघून भारतामधील किआच्या प्रसिद्ध सेल्टॉसचा 59% सहभाग होत आहे
  8. • कंपनीच्या एकत्रीत डिस्पॅच (निर्यात सहित) 6,34,224 झाले आहे

या प्राप्तीबद्दल बोलतांना, किआ इंडियाचे प्रमुख विक्री अधिकारी म्युंग-सिक शॉन म्हणाले, “भारतात 3 वर्षांच्या कमी कालावधीत, आम्ही केवळ ट्रेंड लीडिंग आणि प्रेरणादायी ब्रँड म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले नाही तर नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यातही नेतृत्व केले आहे. किआ इंडियाच्या यशाचे श्रेय मी इकोसिस्टमचा भाग असलेल्या आणि राहिलेल्या प्रत्येकाला देऊ इच्छितो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जागतिक पुरवठा साखळी समस्यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीतही ब्रँडवर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या ग्राहकांप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. मी आज अभिमानाने सांगतो की आम्ही भारतीय ग्राहकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे आणि हीच आमची सर्वात मोठी उपलब्धी आहे.”

ते पुढे म्हणाले, “भारतासाठी भारत ही एक अग्रेसर बाजारपेठ राहिली आहे, आणि म्हणूनच देशातील आमची 5 पैकी 3 उत्पादने केवळ स्थानिक पातळीवरच तयार केली जात नाहीत तर विविध जागतिक बाजारपेठेतही निर्यात केली जातात. अलीकडेच, आम्ही EV6 लाँच करून आणि 150kWh चा सर्वात वेगवान प्रवासी वाहन चार्जर स्थापित करून भारतात ‘सस्टेनेबल मोबिलिटी सोल्युशन्स प्रोव्हायडर’ ब्रँड बनण्याची आमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. आमच्या केंद्रित दृष्टिकोनामुळे, आम्ही आता किआच्या जागतिक विक्रीमध्ये 6% पेक्षा जास्त योगदान देतो. भारत हा अफाट क्षमता असलेला देश आहे आणि आमची जागतिक दर्जाची उत्पादने आणि तंत्रज्ञान सातत्याने आणून भारतातील उत्पादन वाढीसाठी योगदान देणे सुरू ठेवण्याचे आमचे ध्येय आहे.”

किआ हे भारतभर प्रसिद्ध नाव बनले आहे आणि क्षेत्रानुसार व्यवस्थित विक्री योगदानाची साक्ष देते. देशातील ब्रँडची वाढती सुलभता देशातील प्रदेशांमध्ये KIN च्या वाहनांची प्रगतीशील विक्री सुनिश्चित करते. वर्ष 2022 च्या अखेरीस 225 शहरांमध्ये 339 वरून 400 पर्यंत विक्री वाढवण्याचा ब्रँडचा मानस आहे.

वर्ष 2022 हे किआ इंडियाचे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी वर्ष आहे कारण गेल्या वर्षीच्या विक्रीच्या जवळपास 70% विक्री झाली आहे. शिवाय, जवळपास 2.5 लाख कनेक्टेड कार विक्री आणि 97% सक्रियता दरासह, किआ इंडिया तांत्रीक उत्कृष्टता असलेली म्हणून ग्राहकांमध्ये एक लोकप्रिय पर्याय म्हणून उदयास आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.