maruti victoris आणि Tata Sierra लवकरच होणार लाँच!
टाटा सिएरा ईव्ही पुढील 2-3 महिन्यांत भारतात परत येणार आहे. तर एसयूव्ही मॉडल असलेल्या टाटाच्या या कारमध्ये नवीन डिझाइन, तंत्रज्ञानाने सुसज्ज असे इंटीरियर आणि अनेक पॉवरट्रेन पर्यायांसह लाँच करण्यात येऊ शकते. त्याचवेळी, मारुती सुझुकीची नवीन व्हिक्टोरिस एसयूव्ही 6 ट्रिम या प्रकारांमध्ये येणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या कारच्या मॉडलेचे स्पेसिफिकेशन आणि किंमत जाणून घेऊयात...

2015 मध्ये लाँच झाल्यापासून ह्युंदाई क्रेटा मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमधील वाहनांना जोरदार टक्कर देत आहे. तर आता क्रेटाला कडक टक्कर देण्यासाठी मारुती सुझुकीची मारुती व्हिक्ट्रोइस आणि टाटा मोटर्सची टाटा सिएरा हे दोन्ही मॉडेल भारतात लाँच होण्यासाठी सज्ज आहेत. तर त्यातील व्हिक्ट्रोइस या दिवाळीच्या अगदी आधी भारतीय बाजारपेठेत लाँच होण्याची शक्यता आहे, तर टाटाची सिएरा इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
मारुती व्हिक्टोरिस बुकिंग रक्कम
मारुती सुझुकीची नवीन व्हिक्टोरिस एसयूव्ही 6 ट्रिम प्रकारांमध्ये येते – LXI, VXI, ZXI, ZXI (O), ZXI+ आणि ZXI+ (O) आणि ती अरेना डीलरशिपद्वारे विकली जाणार आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही ही कार फक्त 11,000 रुपयांना बुक करू शकता.
मारुती व्हिक्टोरिस इंजिन
व्हिक्टोरिस ही मारुती सुझुकीची पहिली कार आहे ज्यामध्ये लेव्हल 2 एडीएएस, डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ सिस्टम आणि अंडरबॉडी सीएनजी टँक आहे. ही एसयूव्ही तीन इंजिन पर्यायांमध्ये येईल – 103 बीएचपी, 1.5-लिटर माइल्ड हायब्रिड पेट्रोल, 116 बीएचपी 1.5 -लिटर स्ट्राँग हायब्रिड आणि 89 बीएचपी, 1.5-लिटर पेट्रोल सीएनजी.
टाटा सिएरा ईव्ही
टाटा सिएरा ईव्हीबद्दल बोलायचे झाले तर, ही कार पुढील 2-3 महिन्यांत भारतात परतणार आहे. या एसयूव्हीमध्ये टाटाचे नवीन डिझाइन, तंत्रज्ञानाने सुसज्ज इंटीरियर आणि अनेक पॉवरट्रेन पर्याय आहेत. सुरुवातीला, सिएरा पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह ऑफर केली जाईल, त्यानंतर त्याचे आयसीई मॉडेल देखील 2026 च्या सुरुवातीला लाँच केले जाईल. टाटाची ही कार इलेक्ट्रिक वर्जनमधील पॉवरट्रेन हॅरियर ईव्हीमधून घेता येईल, जी दोन बॅटरी पॅक पर्याय आणि क्यूडब्ल्यूडी सिस्टमसह येते.
टाटा सिएरा ईव्ही इंजिन
ICE-आधारित टाटा सिएरा ब्रँडची ही नवीन कार 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 2.0 लिटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित असेल. त्यानंतर यात टर्बोचार्ज्ड 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देखील सादर केले जाईल. एसयूव्हीमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड आणि पॉवर्ड फ्रंट सीट्स, बिल्ट-इन डॅशकॅम, लेव्हल-2 एडीएएस आणि इतर वैशिष्ट्ये मिळण्याची शक्यता आहे.
