Ola कडून 50 टक्के कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण, आरोग्य विम्यासह औषधांसाठी 30000 रुपयांची मदत

ओलाने (Ola) माहिती दिली आहे की, त्यांनी आपल्या 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना कोरोनावरील लसीचा पहिला डोस दिला आहे.

Ola कडून 50 टक्के कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण, आरोग्य विम्यासह औषधांसाठी 30000 रुपयांची मदत
Ola Covid Care Package

मुंबई : ऑनलाईन वाहन बुकिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार्‍या ओलाने (Ola) माहिती दिली आहे की, त्यांनी आपल्या 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना कोरोनावरील लसीचा पहिला डोस दिला आहे. कंपनीने एका निवेदनात ही माहिती दिली. ओलाने आपल्या कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी मोठ्या रुग्णालयांशी भागीदारी केली आहे आणि ओला कॅम्पसमध्ये लसीकरण शिबिरे आयोजित केली आहेत. (Ola completes vaccination for over 50% staff and dependents)

कंपनीने मार्चमध्ये घोषणा केली होती की, ते आपल्या सर्व कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या अवलंबितांना तसेच कंत्राटदार, सल्लागार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना मोफत लस पुरवतील. कंपनीने म्हटलं आहे की, त्यांनी यापूर्वीच लसीचा पहिला डोस 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ओलाने एप्रिलमध्ये 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. उर्वरित कर्मचारी आणि इतरांचे लसीकरण करण्याची मोहीम गेल्या आठवड्यात सुरू झाली आहे, सरकारने 1 मेपासून 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली आहे.

ओलाने म्हटलं आहे की, बंगळुरू येथे सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे, कंपनीचे बहुतेक कर्मचारी तिथेच आहेत. लस पुरवठ्यात सुधारणा झाल्याने येत्या आठवड्यात हे इतर शहरांमध्येही वाढविण्यात येईल. ओला ग्रुपचे चीफ एचआर अधिकारी रोहित मुंजाळ यांच्या म्हणण्यानुसार, “साथीच्या रोगाविरूद्ध सुरु केलेल्या मोहिमेतील लसीकरण ही एक महत्त्वाची पायरी आहे आणि येत्या आठवड्यात आमच्या सर्व लोकांचे लसीकरण करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

औषधांसाठी 30000 रुपयांची मदत

यासह, कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांच्या विद्यमान आरोग्य सेवा धोरणात COVID चा समावेश केला आहे. या व्यतिरिक्त कंपनी औषधे, उपकरणे इत्यादींसारख्या COVID ट्रिटमेंटमध्ये केलेल्या कोणत्याही खर्चासाठी 30,000 रुपयांपर्यंत रोख रक्कमही देत ​​आहे. या गोष्टींव्यतिरिक्त, ओला आपल्या कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र मानसिक आरोग्य समुपदेशक आणि 24X7 COVID केअर हेल्पलाइन देखील प्रदान करीत आहे. ज्याद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांची मदत केली जाऊ शकते आणि कर्मचार्‍यांना ते आजारी असल्यास बेड बुक करण्यास मदत करता येईल. तसेच त्यांना औषधं आणि आवश्यकता असल्यास ऑक्सिजन पुरवता येईल.

संबंधित बातम्या

Ola कंपनी स्कूटरसह इलेक्ट्रिक कार लाँच करणार, कमी बजेटमध्ये जबरदस्त रेंज आणि फीचर्स

EXCLUSIVE : ओलाच्या प्रत्येक राईडवर 25000 रुपयांचा कोविड विमा मिळवा, जाणून घ्या याबाबत सर्व माहिती

ओला, उबरसह इतर कंपन्यांना ट्राफिक पोलिसांचा दणका, कोट्यवधींचा दंड भरण्याचे आदेश 

(Ola completes vaccination for over 50% staff and dependents)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI