AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ola S1 EV : आता 20 हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर घरी न्या

Ola S1 EV : भारतात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस1 सीरीजला चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीने आता एक खास ऑफर आणली आहे. ओला एस1 एअर ही स्कूटर तुम्ही केवळ 20 हजार रुपये डाऊनपेमेंट करुन घरी घेऊन जाऊ शकता. तुम्हाला त्यासाठी इतका ईएमआय मोजावा लागेल.

Ola S1 EV : आता 20 हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर घरी न्या
| Updated on: Oct 04, 2023 | 2:57 PM
Share

नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : सध्या इलेक्ट्रिक स्कूटरचे प्रचलन वाढले आहे. पेट्रोल मॉडेल घेण्यापूर्वी सुद्धा ग्राहक एकदा इलेक्ट्रिक बाजारात चक्कर मारतोच मारतो. इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय तो शोधतोच. अनेकदा चांगल्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची इच्छा असते. पण किंमत पाहिल्यावर अनेक जणांचा मूड बदलतो. पण ओला इलेक्ट्रिकने यावर एक उपाय शोधला आहे. ओला इलेक्ट्रिकच्या एस1 सीरीज अंतर्गत एकूण 4 स्कूटर मिळतात. त्यातील ओला एस1 एअर ही मध्यम बजेट स्कूटर आहे. तिची जोरदार विक्री सुरु आहे. ओला कंपनीने आता एस1एक्स नावाने स्वस्त स्कूटर पण बाजारात आणली आहे. पण किंमतीच्या दृष्टीने ओला एस1 एअरवर सर्वच फिदा आहेत. ओलाची स्कूटर (Ola S1 Air Electric Scooter Finance) आता तुम्हाला 20 हजार रुपये डाऊनपेमेंट करुन घरी घेऊन जाता येईल.

ओला एस1 एअरची किंमत

ओला एस1 एअरची किंमत आणि फीचर्स काय आहेत, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरुम किंमत 1.20 लाख रुपये आहे आणि ऑन रोड किंमत 1,24,412 रुपये आहे. ही ओला 6 रंगात येते. या स्कूटरमध्ये 3 Kwh बॅटरी आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार ही स्कूटर 101 किलोमीटरची रेंज देते. बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी चार तास लागतात. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्पीकर, मल्टीपल ड्राईव्ह मोड, 34 लिटर का स्पेस, फास्ट चार्जिंग, एलईडी लाइट्स, 90 kmph ची स्पीडसह अनेक फीचर येतात.

किती मिळेल कर्ज, किती दिवसांचा हप्ता

आता तुम्हाला ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटर फायनान्सवर म्हणजे कर्जावर उपलबध होत आहे. तुम्हाला एक रक्कमी किंमत अदा करायची नसेल तर एक ऑफर आहे. 20 हजार रुपये डाऊनपेमेंट भरुन ही स्कूटर तुम्हाला फायनान्सवर खरेदी करता येईल. ओला इलेक्ट्रिकच्या वेबसाईटनुसार अनेक बँका ही स्कूटर खरेदी करण्यासाठी जवळपास 7 टक्के दराने कर्ज पुरवठा करत आहेत. 20 हजार रुपये डाऊनपेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक लाख 5 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. तीन वर्षांसाठी कर्ज घेत असाल तर त्यासाठी 3225 रुपयांचा हप्ता येईल. पुढील 36 महिने तुम्हाला ईएमआयचा हप्ता भरावा लागेल. या कर्जासाठी तुम्हाला 11,700 रुपये व्याजापोटी द्यावे लागतील.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.