शानदार ऑफर! Renault च्या ‘या’ गाड्यांवर 75000 रुपयांची सूट

अक्षय चोरगे

|

Updated on: Mar 15, 2021 | 11:53 AM

Renault ने क्विड, ट्रायबर सबकॉम्पॅक्ट एमपीव्ही आणि डस्टर कॉम्पॅक्ट एसयूव्हीसह निवडक बीएस 6 वाहनं विशेष ऑफरसह सादर केली आहेत

शानदार ऑफर! Renault च्या 'या' गाड्यांवर 75000 रुपयांची सूट
Renault Triber
Follow us

मुंबई : Renault India ने क्विड (Kwid) हॅचबॅक, ट्रायबर सबकॉम्पॅक्ट एमपीव्ही आणि डस्टर कॉम्पॅक्ट एसयूव्हीसह निवडक बीएस 6 वाहनं विशेष ऑफरसह सादर केली आहेत. या वाहनांवर 1.05 लाख रुपयांपर्यंतचा विशेष लाभ देण्यात येत आहे. (Renault Special Offer Get Rs 75000 Discount On Kwid, Triber and Duster)

कार निर्माता कंपनी क्विड (Kwid) आणि ट्रायबरवर (Triber) 5.99 टक्के विशेष दराने अर्थ योजना देण्यात आली आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, फायनान्स प्रॉफिट आणि लॉयल्टी बेनिफिटचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण ग्राहकांना एक खास ऑफर आणि कॉर्पोरेट सवलतही दिली जात आहे.

रेनॉ क्विड एंट्री लेव्हल हॅचबॅक कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 50,000 पर्यंतच्या एकूण लाभांसह सूचिबद्ध करण्यात आली आहे. यात 20,000 रुपयांपर्यंतची रोख सवलत, 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंतच्या लॉयल्टी बोनसचा समावेश आहे.

ट्रायबर एमपीव्ही या कारवर 60,000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे, त्यात 30,000 रुपयांची रोख सवलत, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आणि 10,000 पर्यंतच्या लॉयल्टी बोनसचा समावेश आहे.

डस्टरवर 75000 रुपयांची ऑफर

या महिन्यात रेनॉ डस्टरच्या दोन्ही वेरिएंटवर विशेष फायदे लागू आहेत. या एसयूव्हीच्या 1.3-लीटर वेरिएंटवर 75,000 रुपयांपर्यंत सवलत उपलब्ध आहे, ज्यात रोख 30,000 रुपये, 30,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज लाभ आणि 15,000 रुपयांपर्यंतच्या लॉयल्टी बेनिफिटचा समावेश आहे. दुसरीकडे 1.5 लीटर पेट्रोल वेरिएंटवर एकूण 45,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. यात अनुक्रमे 30,000 आणि 15,000 रुपयांच्या फायनान्स प्रॉफीट तसेच लॉयल्टी बेनिफिटचा समावेश आहे.

देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कारचं नवं मॉडल लाँच

Renault India ने त्यांची 2021 Triber भारतात लाँच केली आहे. भारतीय बाजारपेठेतील या कारची सुरुवातीची किंमत 5.30 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे, तर या कारच्या टॉप वेरिएंटची किंमत 7.82 लाख रुपये इतकी आहे.

कंपनीने आपल्या रेनॉ ट्रायबरचे (Renault Triber) 2021 मॉडेल नवीन कलर ऑप्शनसह लाँच केले आहे. या व्यतिरिक्त, या कारच्या एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये बदल करण्यात आले आहेत. जुन्या व्हर्जनप्रमाणे कंपनीने 2021 मॉडल चार वेरिएंट्समध्ये लाँच केलं आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ या वेरिएंट्सचा समावेश आहे.

2021 Renault Triber मध्ये काय आहे नवीन?

2021 Renault Triber मध्ये ड्युअल हॉर्नचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय आरएक्सई आणि आरएक्सएल (RXE आणि RXL) ट्रिममध्ये कोणतेही नवीन फीचर्स जोडलेले नाहीत. RXT वेरिएंटच्या ORVMs मध्ये नवीन एलईडी टर्न इंडिकेटर आहेत. याशिवाय नवीन स्टीयरिंग-माउंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल यात देण्यात आले आहेत.

या कारच्या टॉप स्पेसिफिकेशन वाल्या RXZ वेरिएंटमध्ये मध्ये उंच आणि अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट देण्यात आली आहे. या कारमध्ये मिस्ट्री ब्लॅक रूफ आणि ऑप्शनल ड्युअल-टोन एक्सटीरियर असलेले ORVMs देण्यात आले आहेत.

Renault ने त्यांच्या 2021 ट्रायबर लाईनअपमध्ये एक नवीन सीडर ब्राउन पेंट स्कीम जोडली आहे. नवीन ड्युअल-टोन एक्सटीरियर कलर ऑप्शन केवळ 2021 Renault Triber च्या टॉप स्पेसिफिकेशन मॉडेलमध्ये उपलब्ध असेल. 2021 Triber RXZ व्हेरिएंटसाठी ग्राहकांना अतिरिक्त 17,000 रुपये द्यावे लागतील.

परफॉर्मन्स

2021 Renault Triber मध्ये कोणताही मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये 999 सीसी चं 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. या कारचं इंजिन 6250 आरपीएमवर 72 PS मॅक्सिमम पॉवर आणि 3500 आरपीएमवर 96Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या कारचं इंजिन 5-स्पीड मॅनुअल गियरबॉक्सने सुसज्ज आहे.

हेही वाचा

7 नव्या बदलांसह 2021 Maruti Suzuki Swift बाजारात, ‘या’ फीचर्समुळे कारची लोकप्रियता आणखी वाढेल

भारतीयांच्या मनात भरलेली TATA Tiago क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

किंमत 3 लाखांहून कमी, जबरदस्त मायलेज देणाऱ्या ‘या’ कार्सवर 60 हजारांचा डिस्काऊंट

(Renault Special Offer Get Rs 75000 Discount On Kwid, Triber and Duster)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI