Renault Car Price Hike : 1 एप्रिलपासून रेनॉच्या गाड्या महागणार

वाढत्या इनपुट कॉस्टमुळे ऑटो कंपन्यांनी एप्रिलमध्ये त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. (Renault increase vehicle prices)

Renault Car Price Hike : 1 एप्रिलपासून रेनॉच्या गाड्या महागणार
Renault India
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 1:57 PM

मुंबई : वाढत्या इनपुट कॉस्टमुळे ऑटो कंपन्यांनी एप्रिलमध्ये त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकी, निसान इंडिया, हीरो मोटोकॉर्प, कावासाकी, Escorts आणि इसुझू मोटर्स इंडियाने यापूर्वीच दरवाढीची घोषणा केली आहे. आता रेनॉ इंडियाने (Renault India) जाहीर केले आहे की, एप्रिल 2021 पासून ते देशभरात त्यांच्या कार्सच्या किंमती वाढवतील. (Renault to increase vehicle prices from April 2021)

रेनॉ इंडियाने (Renault India) म्हटले आहे की, त्यांनी बदल केलेल्या नव्या किंमती सर्व मॉडेल्स लाइन-अपवर लागू होतील, नवीन दरवाढ वेगवेगळ्या मॉडेल्स आणि वेगवेगळ्या प्रकारांनुसार होईल. कंपनीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात रेनॉ इंडियाने म्हटले आहे की, “स्टील, अ‍ॅल्युमिनियम आणि प्लॅस्टिकच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे इनपुट कॉस्ट वाढतेय, परिणामी वाहनांच्या किंमती वाढवाव्या लागत आहेत.

या वर्षात दुसऱ्यांदा दरवाढ

रेनॉ कंपनीने गाड्यांच्या किंमती वाढवण्याची ही या वर्षातली पहिलीच वेळ नाही. जानेवारी 2021 मध्ये फ्रेंच कार निर्माता कंपनीने आपल्या कार्सच्या किंमती 28,000 रुपयांपर्यंत वाढवल्या होत्या. तेव्हादेखील कंपनीने म्हटले होते की, वाढत्या इनपुट कॉस्टमुळे आम्ही वाहनांच्या किंमती वाढवतोय. तसेच COVID-19 महामारी आणि लॉकडाऊन काळात स्टील, अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिकच्या किंमती वाढल्या होत्या. त्यामुळे कंपनीला दरवाढीचा निर्णय घ्यावा लागला.

निसान आणि मारुती सुझुकीची वाहनं महागणार

निसान इंडियाने (Nissan India) जाहीर केले आहे की, ते एप्रिल 2021 पासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहेत. वाढत्या इनपुट कॉस्टचा प्रभाव कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) यांनी कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीची भरपाई करण्यासाठी पुढील महिन्यापासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, देशातील सर्व मॉडेल्सवर ही दरवाढ लागू होईल.

देशातील सर्वात मोठी कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (MSI) पुढच्या महिन्यापासून मारुती सुझुकीच्या कार महागणार असल्याचं सांगितलंय. कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीची भरपाई करण्यासाठी ते आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत (Cars Price Hike From 1st April) वाढ करणार असल्याचं कंपनीनं सोमवारी सांगितलं. शेअर बाजाराला दिलेल्या अहवालात मारुती सुझुकीनं यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलंय.

महिंद्रा, आयशर, अशोक लेलँडच्या किंमतीही वाढणार

कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ ही वाहन उद्योगातील किंमती वाढण्यामागचं प्रमुख कारण आहे. या वर्षात अशी वाढ दुसऱ्यांदा होत आहे. वाहन उत्पादक कंपन्या पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किंमती 1 ते 3 टक्क्यांनी वाढवू शकतात. महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर मोटर्स आणि अशोक लेलँड या कंपन्या एप्रिल-मेमध्ये दर वाढवू शकतात.

संबंधित बातम्या

चारचाकीनंतर दुचाकींच्या किंमतीदेखील वाढणार, ‘या’ आघाडीच्या कंपनीची Price Hike ची घोषणा

कार्सपाठोपाठ बाईक-स्कूटरदेखील महागणार, हिरो मोटोकॉर्पकडून Price Hike ची घोषणा

तुमची आवडती कार लवकर बुक करा, 1 एप्रिलपासून ‘या’ गाड्या महागणार

(Renault to increase vehicle prices from April 2021)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.