Tata, Mahindra च्या दोन गाड्यांची ग्राहकांना प्रतीक्षा, लवकरच लाँच होणार शानदार SUV

देशातील आघाडीच्या कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या 2021 मध्ये एसयूव्ही कार्स लाँच करण्याचा धडाकाच लावणार आहेत.

Tata, Mahindra च्या दोन गाड्यांची ग्राहकांना प्रतीक्षा, लवकरच लाँच होणार शानदार SUV
Tata and Mahindra
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 7:37 AM

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भारतात एसयूव्हींना जबरदस्त मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्यांनी भारतात 2020 मध्ये बऱ्याच एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केल्या. देशातील आघाडीच्या कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या 2021 मध्ये एसयूव्ही कार्स लाँच करण्याचा धडाकाच लावणार आहेत. भारतात SUV सेगमेंटमध्ये सध्या ह्युंदाय आणि किआ मोटर्स या दोन कंपन्यांची स्थिती मजबूत आहे. या कंपन्यांना महिंद्रा, टाटा या भारतीय कंपन्या टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. (Tata and Mahindra planning to launch two new SUVs)

भारतीय कार उत्पादक टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यावर्षी नवीन एसयूव्ही लाँच करणार आहेत. अशा परिस्थितीत ग्राहक या एसयूव्हींची आतुरतेने वाट पाहात आहेत. या वाहनांचे यावर्षी आगामी काही महिन्यांत लाँचिंग होणार आहे. टाटा आपली एचबीएक्स कन्सेप्ट बेस्ड मिनी एसयूव्ही आणि बीएस 6 हेक्सा सफारी लाँच करण्याची योजना आखत आहे, तर महिंद्रा न्यू जनरेशन XUV500 आणि स्कॉर्पिओ (New XUV500, New Scorpio) लाँच करणार आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटा HBX च्या प्रॉडक्शन रेडी आवृत्तीला Timero असे नाव दिले जाणार आहे. दिवाळीपूर्वी ही मायक्रो एसयूव्ही शोरूममध्ये पाहायला मिळेल. दरम्यान, वाहनाचे अंतिम मॉडेल मे महिन्यात लाँच केले जाऊ शकते. HBX अल्फा मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार केलं जाईल, तसेच यामध्ये टाटाची नवीन इम्पॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेज दिली जाईल. टाटाने 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये ही मायक्रो एसयूव्ही सादर केली होती.

फीचर्स

टाटाच्या या गाडीचे बहुतेक डिझाइन एलिमेंट्स हॅरियरकडून घेतले जातील, विशेषत: वाहनाचा पुढील भाग. यामध्ये आपणास 86bhp, 1.2L नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 100bhp टर्बो पेट्रोल इंजिनाचा पर्याय देण्यात येईल. टाटा बर्‍याच काळापासून नवीन हेक्सा सफारीची चाचणी घेत आहे. हे मॉडेल बीएस 6 कंप्लायंट 2.2L Varicor टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनासह सादर केले जाईल, जे आपल्याला 156bhp आणि 400Nm टॉर्क देईल. यात ऑइल बर्नर 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येईल. यात 4X4 ड्राइव्हट्रेन सिस्टम असेल.

महिंद्रा XUV500

सेकेंड जनरेशन महिंद्रा XUV500 आणि नवीन स्कॉर्पियोमध्ये डिझाईनच्या बाबतीत बरेच बदल केले जातील. दोन्ही एसयूव्ही मोठ्या डिझाइनसह आणि अधिक सामर्थ्यवान वैशिष्ट्यांसह येतील. या वाहनांच्या आत हूडमध्ये आणखी बदल दिसतील. 2021 महिंद्रा एक्सयूव्ही 500 मध्ये 190bhp, 2.0 लिटर mStallion पेट्रोल आणि 180bhp, 2.2l डिझेल इंजिन पर्याय मिळतील. 2021 महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये 152bhp, 2.0l mStallion पेट्रोल आणि 158bhp, 2.2l डिझेल इंजिन मिळेल. दोन्ही एसयूव्हींचे नवीन जनरेशन मॉडेल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येईल.

इतर बातम्या

Renault Kiger खरेदी करताय? इतके महिने वाट पाहावी लागेल

Mercedes-Benz ची लक्झरी E-Class चं नवं फेसलिफ्ट मॉडेल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Photos | Kia ची इलेक्ट्रिक कार EV6 चा फर्स्ट लूक जारी, नव्या डिझाईनसह कार सादर होणार

(Tata and Mahindra planning to launch two new SUVs)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.