भारतीयांच्या पसंतीस उतरलेली TATA Punch जानेवारी 2022 पासून महागणार, लाँचिंगनंतर अवघ्या तीन महिन्यात दरवाढ

Tata Motors ने ऑक्टोबर 2021 मध्ये देशात पंच सब-कॉम्पॅक्ट SUV लाँच करून भारतात आपली उत्पादन श्रेणी वाढवली. अवघ्या 5.49 लाख रुपये किंमतीसह टाटाने ही कार बाजारात दाखल केली होती.

भारतीयांच्या पसंतीस उतरलेली TATA Punch जानेवारी 2022 पासून महागणार, लाँचिंगनंतर अवघ्या तीन महिन्यात दरवाढ
TATA Punch
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Dec 19, 2021 | 11:50 PM

TATA Punch Price Hike 2022 : Tata Motors ने ऑक्टोबर 2021 मध्ये देशात पंच सब-कॉम्पॅक्ट SUV लाँच करून भारतात आपली उत्पादन श्रेणी वाढवली. अवघ्या 5.49 लाख रुपये किंमतीसह टाटाने ही कार बाजारात दाखल केली होती. त्यावेळी कंपनीने सांगितले होते की, ही किंमत 31 डिसेंबर 2021 पर्यंत लागू राहणार आहे. त्यानुसार, टाटा मोटर्स पंच मायक्रो-एसयूव्हीच्या किंमती जानेवारी, 2022 पासून सुधारित करेल. पंच व्यतिरिक्त, टाटा मोटर्स उत्पादन लाइन-अपमधील इतर मॉडेल्सच्या किंमती देखील सुधारित करेल. मात्र, कारच्या नव्या किंवा सुधारित किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. (TATA Punch will be more expensive from January 2022, Price hike in just three months after launch)

या कारमध्ये अनेक चांगले फीचर्स, रंग पर्याय आणि आकर्षक डिझाईन देण्यात आले आहे. या किंमतीच्या सेगमेंटमध्ये ही कार अनेक चांगल्या कारशी स्पर्धा करत आहे. ही कार मोठ्या आणि लहान शहरांमधील ग्राहकांसाठी तयार केली गेली आहे. टाटा मोटर्सने डिझाइन केलेले टाटा पंचचे डिझाईन अनेकांना आकर्षित करत आहे. जरी हे मोठ्या शहरांसाठी कॉम्पॅक्ट डिझाइन आहे, परंतु लहान शहरे आणि खराब रस्त्यांवरही ही कार उत्तम असल्याचे म्हटले आहे, कारण ही कार चांगल्या ग्राउंड क्लीयरन्ससह सादर करण्यात आली आहे.

Tata Punch चे व्हेरिएंट्स आणि किंमती

  • प्योर : 5.49 लाख रुपयांपासून सुरू
  • अॅडव्हेंचर : 6.39 लाख रुपयांपासून सुरू
  • अकम्पलिश : 7.29 लाख रुपयांपासून सुरू
  • क्रिएटिव्ह : 8.49 लाख रुपयांपासून सुरू

कस्टमाइज पॅक

  • प्योर + रिदम पॅक : 35000
  • अॅडव्हेंचर + रिदम पॅक : 35000
  • अकम्पलिश + डॅझल पॅक: 45000
  • क्रिएटिव्ह + IRA : 30000
  • 5 स्टार रेटिंग मिळवणारी कंपनीची तिसरी कार

टाटा मोटर्सने (Tata Motors) गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी नुकतीच सादर केलेली मायक्रो एसयूव्ही टाटा पंचला ग्लोबल एनसीएपी कडून प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी (Adult Safety) 5-स्टार रेटिंग (16.453) आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 4-स्टार रेटिंग (40.891) प्राप्त झाले आहे. जानेवारी 2020 मध्ये अल्ट्रॉझ आणि डिसेंबर 2018 मध्ये नेक्सॉन नंतर टॉप सुरक्षा रेटिंग मिळवणारे नवीन पंच हे टाटाचे तिसरे वाहन आहे.

शानदार फीचर्स

ही कार रस्त्यावर येण्यापूर्वी तिच्या फीचर्समुळे लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. या कारमध्ये केवळ चांगला ग्राउंड क्लिअरन्सच नाही तर ब्रेकिंग सिस्टीमपासून ते डोर ओपनिंगपर्यंत अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. सोशल मीडियापासून मेन स्ट्रीम मीडियापर्यंत सर्वत्र या कारबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. या कारच्या फीचर्सबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. चला तर मग टाटाच्या या नव्या कारबद्दल जाणू घेऊया.

टाटाची ही कार एमएमटी ट्रांसमिशन पर्यायासह उपलब्ध असेल, ज्यांना ऑटोमँटिक ट्रान्समिशन कार हवी असणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय सिद्ध होईल. ही कार टाटा टियागोपेक्षा मोठी असेल. कंपनी 20 ऑक्टोबर रोजी टाटा पंचची किंमत आणि इतर माहिती जारी करेल. दरम्यान, कार निर्मात्या कंपनीने आपल्या सोशल मीडिया चॅनल्सवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात म्हटले आहे की, पंचचे दरवाजे 90 अंशांच्या कोनात उघडतील. या सुविधेमुळे लोकांना वाहनातून आत किंवा बाहेर जाणे सोपे होईल.

कशी आहे नवी टाटा पंच?

नवीन टाटा पंच ALFA-ARC (Agile Light Flexible Advanced Architecture) वर बनवलेली पहिली SUV असेल आणि भारतातील Nexon subcompact SUV च्या खाली असेल. पंचमध्ये कंपनीच्या इम्पॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेजचा वापर करण्यात आला आहे. ही कार आक्रमक स्टायलिंग लूकसह येते. टाटा मोटर्सने आधीच निळ्या आणि ड्युअल-टोन रंगाचे पर्याय जाहीर केले आहेत आणि सिंगल टोन रंगांसह आणखी दोन-टोन पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. “सणासुदीच्या काळात ही कार नॅशनल लाँचिंगसाठी सज्ज आहे. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, स्पोर्टिंग डायनॅमिक्ससह टफ यूटिलिटीचं मिश्रण या कारमध्ये पाहायला मिळेल.

टाटा मोटर्सने पुष्टी केली आहे की, पंच आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या अपोझिट जॅक-अप हॅचबॅकपेक्षा अधिक श्रेष्ठ असेल आणि या एसयूव्हीमध्ये अनेक दमदार फीचर्स असतील. कंपनीने सूचित केले आहे की, या कारमध्ये काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील जसे की, ट्रॅक्शन मोड (सँड, रॉक, मड), हिल डिसेंट कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट, तसेच एसयूव्ही क्रेडेन्शियलसारखे काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील. ही कार पुढच्या बाजूला 185 मिमीच्या हाय ग्राउंड क्लिअरन्स आणि 16 इंच अलॉय व्हीलसह येईल.

आकर्षक डिझाईन

टाटाच्या सिग्नेचर स्प्लिट लायटिंग डिझाइनसह या कारचा फ्रंट एंड आक्रमक आहे. टाटा लोगोमधील काळ्या पॅनेलमध्ये ट्राय-अॅरो पॅटर्न देखील आहे, ज्याभोवती एलईडी डे-टाइम रनिंग लँप आहे. तर मुख्य हेडलॅम्प युनिट्स खाली स्थित आहेत, जे प्रोजेक्टर लाइटसह येतील. समोरचा बहुतेक भाग जड कव्हरने झाकलेला आहे आणि त्याला एक मोठा ट्राय-अॅरो डिझाईन ग्रिल आणि मोठे गोल फॉग लॅम्प मिळतात.

दमदार इंजिन

कंपनीने पंचचे स्पेसिफिकेशन्स उघड केले नाहीत, तथापि, काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला आहे की, नवीन पंच 1.2-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिनसह येईल, जे Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकला पॉवर देतं. पेट्रोल मिल 85 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड आणि पर्यायी AMT युनिटसह येण्याची शक्यता आहे. लॉन्च झाल्यावर, नवीन टाटा पंच मारुती सुझुकी एस-प्रेसो आणि रेनॉल्ट क्विडशी स्पर्धा करेल. गेल्या वर्षी ऑटो एक्स्पो दरम्यान टाटा मोटर्सने पंचला HBX कॉन्सेप्ट मायक्रो-एसयूव्ही म्हणून पहिल्यांदा प्रदर्शित केली. पंच एसयूव्ही मारुती सुझुकी इग्निस आणि आगामी ह्युंडई मायक्रो-एसयूव्हीला टक्कर देईल, या कारला कॅस्पर म्हटले जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

Suzuki ते Hero, भारतात 2022 मध्ये 4 नव्या इलेक्ट्रिक स्कूटर दाखल होणार

अमिताभ बच्चन आणि युवराज सिंहनंतर MG Motor कडून NFT ची घोषणा, ठरली पहिलीच कारउत्पादक कंपनी

सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, EeVe Soul हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…

(TATA Punch will be more expensive from January 2022, Price hike in just three months after launch)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें