New Maruti XL6 : Kia Carens ला टक्कर, मारुतीची नवीन MPV लाँचिंगसाठी सज्ज

New Maruti XL6 Price: मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) सोमवारी आपल्या ऑल न्यू व्हर्जन MPV कार एक्सएल 6 (Maruti Suzuki XL6) साठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. ही थ्री रो कार आहे. हे मॉडेल नवीन K सीरीज इंजिनवर काम करते.

New Maruti XL6 : Kia Carens ला टक्कर, मारुतीची नवीन MPV लाँचिंगसाठी सज्ज
New Maruti XL6 Image Credit source: Www.nexaexperience.com
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 6:54 PM

New Maruti XL6 Price: मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) सोमवारी आपल्या ऑल न्यू व्हर्जन MPV कार एक्सएल 6 (Maruti Suzuki XL6) साठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. ही थ्री रो कार आहे. हे मॉडेल नवीन K सीरीज इंजिनवर काम करते. यात अॅडव्हान्स्ड ट्रान्समिशन आणि अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, यामध्ये एक बोल्ड स्टायलिंग डिझाईन देण्यात आलं आहे. ज्यामुळे ही कार अधिक आकर्षक बनते. मारुतीची ही कार 11 हजार रुपये देऊन बुक करता येईल. नेक्साचे (Nexa) भारतभरात 410 शोरूम आहेत आणि मारुती सुझुकी कंपनी या शोरूम्समधून Ciaz, Baleno, Ignis, XL6 आणि S-Cross या कार विकते. तर कंपनीच्या इतर कार जसे की Alto, S Presso, WagonR, Celerio, Swift DZire, Vitara Brezza आणि Ertiga सारख्या गाड्या अरेना डीलरशिप अंतर्गत विकल्या जातात.

मारुती XL6 भारतात 21 एप्रिल दरम्यान लॉन्च होईल, परंतु त्याआधी या कारचे प्रमुख फीचर्स समोर आले आहेत. आम्हाला ही माहिती लीक अहवाल आणि रेंडर्समधून मिळाली आहे. मारुती XL6 ही भारतात प्रथम 2019 मध्ये सादर करण्यात आली होती, ही एक प्रकारची प्रीमियम मारुती सुझुकी अर्टिगा कार आहे.

लॉन्च झाल्यानंतर, 2022 मारुती सुझुकी XL6 नुकत्याच लाँच झालेल्या Kia Carens, Renault Triber, Mahindra Marazzo आणि Toyota Innovo Crysta या गाड्यांना तगडी स्पर्धा देईल, असा कंपनीला विश्वास आहे. ही कार थ्री रो सीट्ससह येते.

2022 मारुती सुझुकी XL6 चे संभाव्य इंजिन

2022 मारुती सुझुकी XL6 मध्ये 1.5L पेट्रोल मोटर देण्यात आली आहे. मारुती अर्टिगा फेसलिफ्ट मॉडेलमध्येही या प्रकारचे इंजिन पाहायला मिळाले होते. कंपनी XL6 च्या नवीन व्हर्जनमध्ये K15C इंजिन वापरणार आहे. मारुतीची ही आगामी कार सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्ससह येऊ शकते.

2022 मारुती सुझुकी XL6 चे इंटीरियर

या कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर मारुती यामध्ये कंपनी हेड-अप डिस्प्ले वापरू शकते. यासोबतच यामध्ये 360 व्ह्यू कॅमेराही दिला जाणार आहे. यात ऑटोमॅटिक व्हेरियंटसह पेडल शिफ्टर्स आहेत. कंपनीने अद्याप 2022 Maruti XL6 च्या इतर फीचर्सबद्दल कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.