AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारच्या समोरच्या भागाला का असते जाळी? हे आहे यामागचे कारण

कारच्या मागील बाजूस फक्त बंपर दिलेले असते आणि डिझाइन सुधारण्यासाठी स्किड प्लेट्स दिल्या असतात. मग तुम्ही कधी विचार केला आहे का की कारला फ्रंट ग्रिलच का दिले जातात?

कारच्या समोरच्या भागाला का असते जाळी? हे आहे यामागचे कारण
कारImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 06, 2023 | 8:04 PM
Share

मुंबई : कारला पुढील बाजूस बंपर आणि लोखंडी जाळी ज्याला आपण ग्रिल म्हणतो (Car Front Grill) ते दोन्ही असतात परंतु मागील बाजूस ग्रिल दिलेली नसते. कारच्या मागील बाजूस फक्त बंपर दिलेले असते आणि डिझाइन सुधारण्यासाठी स्किड प्लेट्स दिल्या असतात. मग तुम्ही कधी विचार केला आहे का की कारला फ्रंट ग्रिलच का दिले जातात आणि फक्त बंपर का दिले जात नाहीत? यामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी दोन मोठी कारणे आहेत. फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. चला जाणून घेऊया.

ग्रिल देण्याची दोन महत्त्वाची कारणे

1.  कारमध्ये ग्रिल हा महत्त्वाचा भाग आहे कारण ते कारचे इंजिन थंड ठेवण्यास मदत करते. ग्रिलमध्ये लहान छिद्रं असतात, ज्याद्वारे बाहेरील हवा इंजिनपर्यंत पोहोचते. ही हवा इंजिनला जास्त गरम होण्यापासून रोखते आणि थंड ठेवण्यास मदत करते. तथापि, इंजिन थंड ठेवण्यासाठी कारमध्ये इतर उपाय देखील केले जातात, परंतु हे देखील त्यापैकी एक आहे. इंजिन योग्य तापमानात राहिल्यास ते चांगले कार्य करते.

2. ग्रिलमुळे कारचे फ्रंट डिझाईन चांगले बनवण्यास मदत होते. कारच्या पुढील भागाला नवीन आणि फ्रेश लुक देण्यासाठी ग्रिलचा वापर केला जातो. हे कार कंपन्यांना त्यांच्या कार इतरांच्या कारपेक्षा वेगळे करण्यात मदत करते. तुमच्या लक्षात आले असेल की साधारणपणे प्रत्येक कार कंपनीच्या गाड्यांमध्ये मिळणाऱ्या ग्रिलचे डिझाइन वेगळे असतात. कार कंपन्याही वेळोवेळी ग्रिल बदलत असतात.

ग्रिलच्या जागी बंपर दिले तर काय होईल?

गाड्यांमध्ये ग्रिल देण्याऐवजी बंपर वरपर्यंत वाढवले तर त्याचे अनेक नुकसान होऊ शकतात. सर्वात मोठा तोटा म्हणजे याचा परिणाम इंजिनच्या कूलिंगवर होईल. बंपर बंद असते आणि हवा इंजिनपर्यंत पोहोचण्यासाठी त्यातून जाणार नाही, ज्यामुळे इंजिनच्या थंड होण्यावर परिणाम होईल कारण हवेची योग्य मात्रा इंजिनपर्यंत पोहोचणार नाही. इंजिन थंड ठेवण्याचा हा नैसर्गिक उपाय आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.