बेस्टच्या अर्थसंकल्पात 1,887 कोटींची तूट, बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर अर्थसंकल्प महापालिकेत सादर

बेस्ट उपक्रमाच्या 2021-22 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाला बेस्ट समितीने मंजुरी दिली असून हा अर्थसंकल्प महापालिकेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

बेस्टच्या अर्थसंकल्पात 1,887 कोटींची तूट, बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर अर्थसंकल्प महापालिकेत सादर
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 6:32 PM

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या 2021-22 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात (BEST Budget) एक हजार 887 कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी हा तूटीचा अर्थसंकल्प बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्याकडे 10 ऑक्टोबर रोजी सादर केला होता. या अर्थसंकल्पाला बेस्ट समितीने मंजुरी दिली असून महापालिकेच्या (BMC) मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. (BEST’s budget deficit of Rs 1,887 crore, Budget submitted to BMC after approval of BEST Committee)

या अर्थसंकल्पात विद्युत पुरवठा विभागाचे तीन हजार 532 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले असून खर्च तीन हजार 596 कोटी रुपये अपेक्षित आहे. त्यामुळे विद्युत विभागातच 263.59 कोटी रुपये तूट दर्शविण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या परिवहन विभागातही एक हजार 407 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले असून, तीन हजार 31 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. त्यामुळे परिवहन विभागात एक हजार 624 कोटी रुपयांची तूट दाखविण्यात आली आहे.

दोन्ही विभागांसाठी मिळून चार हजार 939 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले असून सहा हजार 827 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला एक हजार 887 कोटी रुपयांची तूट येणार आहे. दरम्यान ही तूट भरून कशी काढायची याबाबत बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्यांनी सूचना केल्या आहेत.

बेस्टचा वीज विभागही तोट्यात

बेस्ट उपक्रमाचा सन 2021-22 या वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प 1887.83 कोटी तुटीचा मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी किमान 100 कोटी रुपयांचा फायदा करून देणारा बेस्ट उपक्रमाचा वीज विभागही तोट्यात गेला असून ही तूट 263.59 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. परिवहन विभागाची तूट 1624.24 कोटी इतकी अंदाजिली आहे. त्यामुळे पुढच्या आर्थिक वर्षात बेस्टचा व्यवहार तोट्यातच चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अर्थसंकल्पीय वर्षात विद्युत विभागाचे उत्पन्न 3532.30 कोटी तर खर्च 3765.89 कोटी इतका होणार आहे, त्यामुळे वीज विभागाची निव्वळ तूट 253.59 कोटी येणार आहे. परिवहन विभागाचे उत्पन्न 1407 कोटी अंदाजित आहे तर खर्च 3031.24 कोटी इतका होणार आहे. त्यामुळे निव्वळ तोटा 1624.24 कोटी इतका होणार आहे.

बसेसच्या संख्येत वाढ

ऑक्टोबर २०२० मध्ये बेस्ट उपक्रमाकडे ३८७५ बसगाड्यांचा ताफा आहे . ज्यामध्ये १०९९ भाडेतत्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे . या व्यतिरीक्त ३०० विद्युत बसगाड्यांचा खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ६०० एकमजली सीएनजी बसगाड्यांकरीता निविदा प्रक्रिया कार्यरत आहे. पहिल्या टप्प्यात उपक्रमाचा एकूण बसताफा ३१ मार्च २०२२ पर्यंत ६३३७ इतका करण्याचे प्रस्तावित आहे . त्याच प्रमाणे बसस्थानके ,बसचौक्या , बसथांब्यावर प्रवासी माहिती प्रणाली उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

विविध बसस्थानके , बसचौक्या च बसथाचे मिळून एकूण ८०० ठिकाणी प्रवासी माहिती प्रणाली अंतर्गत प्रवाश्यांना उपक्रमाच्या बससेवेची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये बसगाडीची बसथांब्यावर येणारी अपेक्षित वेळ प्रवाशाला समजू शकेल.

भारत सरकारने देशातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्राकरिता ‘ नैशनल कॉमन मोबीलिटी कार्ड ( NCMC ) एक राष्ट्र – एक कार्ड हो योजना राबविण्याचे ठरविलेले आहे. सदर कार्ड सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षेत्राला लागू असेल . उदा . रेल्वे , बसेस , मोनोरेल . मेट्रोरेल व बेस्ट उपक्रम देखिल या योजनेत सहभागी असल्या कारणाने , प्रायोगिक तत्वावर ही योजना कुलाबा व वडाळा आगारात ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात आली आहे, असेही बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.

इतर बातम्या

मुंबईकरांना दिवाळी भेट! बेस्टच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक डबल डेकर बसेस

मुंबई सावरली, दिल्लीत कोरोनाचा कहर का झाला?; सर्व्हेतून आली पाच कारणे!

(BEST’s budget deficit of Rs 1,887 crore, Budget submitted to BMC after approval of BEST Committee)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.