Economic Survey Report 2022 : किरकोळ महागाईत घट, ठोक महागाई वाढली

वस्तू पुरवठ्याचे उत्तम व्यवस्थापन आणि इंधन शुल्कात कपात (Reduction in fuel charges) केल्यामुळे चालू आर्थिक वर्षांत किमती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहिल्या आहेत. मंगळवारी म्हणजे उद्या अर्थसंकल्प (Budget) सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर केले.

Economic Survey Report 2022 : किरकोळ महागाईत घट, ठोक महागाई वाढली
बजेट 2022
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 9:27 PM

नवी दिल्ली : वस्तू पुरवठ्याचे उत्तम व्यवस्थापन आणि इंधन शुल्कात कपात (Reduction in fuel charges) केल्यामुळे चालू आर्थिक वर्षांत किमती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहिल्या आहेत. मंगळवारी म्हणजे उद्या अर्थसंकल्प (Budget) सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर केले. आयात करावे लागलेले खाद्यतेल आणि डाळींच्या किमतीमुळे महागाई वाढली. मात्र विविध उपयायोजनांच्या माध्यमातून सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवल्याचा दावा या आर्थिक सर्वेक्षणात करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये किरकोळ महागाई भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेने ठरून दिलेल्या सहा टक्क्यांच्या समाधानकारक पातळीवर राहिली. मात्र दुसरीकडे वेगाने घडत असलेल्या आर्थिक घडामोडी, जागतिक बाजारपेठेत सातत्याने वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि मालवाहतुकीचा खर्च यामुळे घाऊन महागाई 12 टक्क्यांहून अधिक वाढल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

जागतीक अर्थव्यवस्थेपुढे महागाईचे आव्हान

पुढे या अहवालात म्हटले आहे की, सध्या जागतिक अर्थव्यवस्थेलाच वाढत्या महागाईच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. महागाई वाढण्यामध्ये अन्न आणि विविध पेयांच्या गटाचा मोठा वाटा आहे. एकूण महागाईपैकी जवळपास साठ टक्के महागाई ही अन्न आणि पेयाच्या विविध वस्तूंमुळे वाढली आहे. खाद्यतेलाची मोठ्याप्रमाणात आयात केली जाते. तसेच दाळींची देखील आयात करण्यात आली. त्यामुळे मध्यंतरी खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे देखील या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे. 2021 च्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत महागाई 5.2 टक्क्यांच्या पातळीवर राहिल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी प्रयत्न

दरम्यान गेल्या दोन वर्षांपसून देशासह जगावर कोरोनाचे सावट होते. कोरोमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थवव्यवस्थेला मोठा फटका बसला. मात्र आता कोरोनाची लाट ओसरली असून, अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे देखील या आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. अर्थव्यवस्थेला बूस्टर देण्यासाठी केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचे या अहवालामध्ये नमुद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

BUDGET EXPECTATION FROM SALARIED CLASS : सर्वसामान्य नौकरदार, मध्यमवर्गीयांना यंदाच्या बजेटकडून काय अपेक्षा?

Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्संना सरकारकडून विशेष पॅकेजची प्रतीक्षा, काय होणार घोषणा?

Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा, कृषी कर्जाच्या रकमेत होऊ शकते 18 लाख कोटीपर्यंतची वाढ

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.