AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Watch Company : गरिबीशी करत दोन हात उभारला घड्याळं श्रीमंत करणारा Rolex ब्रँड! एका अनाथ मुलाची अचूक टायमिंग साधणारी जबदस्त कहाणी

Watch Company : तो अवघ्या 12 वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. 1908 पर्यंत त्याने घड्याळं तयार करण्याचं कसबं जाणून घेतलं. पुढे अनेक चढउतार आले. संकटं आली. पण नेटाने त्याने काम सुरुचं ठेवलं आणि पुढे इतिहास घडला, त्याने जो अचूक टायमिंग साधला, तो तुम्ही वाचणार आहात..

Watch Company : गरिबीशी करत दोन हात उभारला घड्याळं श्रीमंत करणारा Rolex ब्रँड! एका अनाथ मुलाची अचूक टायमिंग साधणारी जबदस्त कहाणी
| Updated on: Mar 19, 2023 | 4:03 PM
Share

नवी दिल्ली : आजचे युग ब्रँडचं आहे. प्रत्येकाला कपड्यांपासून ते घरातील अनेक वस्तूंपर्यंत ब्रँडेडचं लागतं. त्या त्या क्षेत्रातील ब्रँड घातला की आपण एक क्लास मेंटनेट करत असल्याचा फील येतो. अर्थात आता घड्याळाचंच घ्या की. बाजारात गेला तर अगदी 30 रुपयांपासून ते कोट्यवधींपर्यंतचे घड्याळ तुम्हाला मिळतील. तुम्ही घड्याळीचं शौकीन असला किंवा नसला तरी तुम्ही Rolex या ब्रँडचं नाव तर नक्कीच ऐकलं असणार . Rolex Watch ही अत्यंत महागडी घड्याळं तयार करते. ही मनगटी घड्याळं दाखवतात टाईमचं, पण मनगटाची जी काय शान वाढवतात म्हणून सांगू की, त्याला एकच शद्ब लागू पडतो, आलिशान! लग्झिरियस आणि महागड्या घड्याळांचा हा ब्रँड, कधीकाळी अत्यंत कफल्लक असलेल्या माणसानं तयार केला होता, हे सांगूनही तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही.

रोलेक्स ही जगातील सर्वात महागडी घड्याळं तयार करणारी कंपनी आहे. अव्वल डिझाईन आणि उत्तम दर्जा यासाठी ही घड्याळं ओळखली जातात. तर या रोलेक्स कंपनीची स्थापना हँस विल्सडॉर्फ (Hans Wilsdorf) आणि अल्फ्रेड डेविस (Alfred Davis) या जोडगोळीने 1905 साली केली होती. ही जगातील सर्वात पसंतीचे, आवडीचे, मौल्यवान, आलिशान घड्याळ मानलं जातं.

22 मार्च 1881 साली जर्मनीतील कुलम्बॅक मध्ये हँस विल्सडॉर्फ यांचा जन्म झाला. त्यांचे वडील डेनियल विल्सडॉर्फ यांचे हार्डवेअरचे एक दुकान होतं. तेव्हा ते केवळ 12 वर्षांचे होते. त्याचवेळी त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यांना जीवनात कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. जगण्यानं त्यानं चांगलचं छळलं. त्यांनी कमालीची गरिबी पाहिली. त्यांच्या काकांनी त्यांना आणि त्यांच्या भावा-बहिणीला खूप मदत केली.

त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये गेले. मोती व्यापाऱ्याकडे ते काम करु लागले. त्यांनी याच काळात घड्याळ तयार करण्याचे काम केले. 19 वर्षांचे असताना त्यांनी घड्याळ्याच्या जगात पाऊल ठेवले. काळ, काम आणि वेग हेच त्यांचे जीवन झाले. त्यांनी या व्यवसायाचं अचूक टायमिंग साधलं आणि पुढे जो झाला तो इतिहास आहे.

काळाच्या पुढे जायचं म्हणून हँस विल्सडॉर्फ यांनी लंडन गाठलं. 1903 साली ते ब्रिटनमध्ये आले. पण येथेही त्यांचा घात झाला. महागडी मालमत्ता खरेदी करण्याच्या मोहात त्यांना लुटण्यात आले. त्यामुळे त्यांना एका घड्याळ्याचा कंपनीत काम सुरु करावे लागले. दोनच वर्षांनी, 1905 साली त्यांनी स्वतःचा उद्योग सुरु करण्याचा निश्चय केला. त्यावेळी त्यांची पत्नीने त्यांना मोठी मदत केली. तिच्यामुळेच त्यांना ब्रिटिनचे नागरिकत्व मिळाले.

त्याच दरम्यान त्यांना मनगटी घड्याळंच स्वप्न पडलं. हे स्वप्न साकारण्यासाठी ते झपाटल्यागत झाले. मनापासून एखाद्या गोष्टीचा धावा केलं की, ती तुमच्यासमोर हात जोडून उभी राहते, असे म्हणतात. त्याचवेळी त्यांना एक व्यवसायिक अल्फ्रेड डेविस भेटले. त्यांना विल्सडॉर्फ यांची कल्पना आवडली. त्यांनी ही कल्पना डोक्यावर घेतली. दोघांनी मिळून विल्सडॉर्फ आणि डेविस नावाची कंपनी सुरु केली.

या कंपनीने सुरुवातीला पॉकेट वॉच सुरु केली. हळूहळू या कंपनीने लोकप्रियता गाठली. हँस यांनी लोकप्रियता पाहता ब्रँडचे नाव बदलण्याचा निश्चिय केला. हँस यांनी रोलेक्स हा शब्द सुचवला. त्याला सर्वांनीच मान्यता दिली. कारण हा शब्द उच्चारायला आणि आठवणीत ठेवायला सोपा होता. म्हणून रोलेक्स हा ब्रँड आपल्या तोंडी रुळला. तर अशी आहे रोलेक्सची पटकथा. 1910 पासून सुरु झालेल्या या मनगटी घड्याळांनी गुणवत्ता आणि दर्जा कधीच घसरु दिला नाही. आज या कंपनीच्या घड्याळ्यांच्या किंमती लाखो आणि कोटीत आहे. पण त्यांची विक्री कधीच कमी झालेला नाही.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.