AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM मधून रोख रक्कम काढणे महागणार, आता किती रुपये आकारणार?

ATM Cash Transaction : एटीएममधून रोख रक्कम काढणे अजून महाग होणार आहे. कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने (CATMI) मोठ्या निधीसाठी इंटरचेंज शुल्क वाढविण्याची वकिली केली आहे. त्याचा फटका बँक ग्राहकांना, एटीएम वापरकर्त्यांना बसणार आहे.

ATM मधून रोख रक्कम काढणे महागणार, आता किती रुपये आकारणार?
कॅश काढणे महागणार
| Updated on: Jun 13, 2024 | 4:55 PM
Share

नोटबंदीनंतर देशात डिजिटल व्यवहारांची लाट आली. पण तरीही बाजारात रोखीतील व्यवहारा मोठ्या प्रमाणात होतात. अनेकांना डिजिटल ॲपवर अजूनही विश्वास नाही. अथवा अनेक व्यवहारांसाठी त्यांना रोखीतील व्यवहार आवडतो. त्यासाठी अर्थातच एटीएम हा सर्वोत्तम पर्याय आहे. आता एक बातमी समोर येत आहे की, एटीएमवरुन पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क आकारण्यात येऊ शकते. देशातील एटीएम ऑपरेटर्स एटीएम रोख रक्कम काढण्यावर इंटरचेंज शुल्कात वाढीची मागणी करत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आणि राष्ट्रीय देयके महामंडळाला (NPCI) यासाठी साकडे घालण्यात आले आहे.

किती वाढेल शुल्क

इकोनॉमिक टाईम्समधील एका वृत्तानुसार, कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने (CATMI) या व्यवहारांसाठी जास्त निधी जमा करण्यासाठी वकिली केली आहे. त्यासाठी इंटरचेंज शुल्क वाढवून 23 रुपये करण्याची मागणी केली आहे. दोन वर्षांपूर्वीच इंटरचेंज शुल्क वाढीचा प्रस्ताव दिला होता, असे एजीएस ट्रांसेक्ट टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक स्टेनली जॉनसन यांनी सांगितले. यामागणासाठी केंद्रीय बँकेशी संपर्क करण्यात आला आहे. काही सदस्यांनी इंटरचेंज शुल्क 21 रुपये तर काहींनी हे शुल्क 23 रुपये करण्याची सूचना केल्याचे म्हणणे त्यांनी मांडले.

सध्या 17 रुपये शुल्क

एजीएस ट्रांसेक्ट टेक्नॉलॉजीजच्या दाव्यानुसार, गेल्यावेळी शुल्क वाढविण्यासाठी बराच कालावधी लागला होता. पण यावेळी त्याच्यावर सहमती होण्याची शक्यता दिसत आहे. शुल्क वाढीसाठी यावेळी अधिक कालावधी लागणार नाही. वर्ष 2021 मध्ये एटीएम व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क 15 रुपयांहून वाढून 17 रुपये करण्यात आले होते.एटीएम कार्ड देणारी बँके हे शुल्क देते. तर ज्या बँकेच्या एटीएममधून ग्राहक रोख रक्कम काढतो, त्या बँकेला हे शुल्क देण्यात येते. वर्ष 2021 मध्ये एटीएम व्यवहारांसाठी ग्राहकांकडून वसूल करण्यात येणाऱ्या शुल्काची मर्यादा 20 ते 21 रुपये प्रति व्यवहार करण्यात आली होती.

कितीदा काढू शकता मोफत रक्कम

खातेदाराला प्रत्येक महिन्याला पाच वेळा त्याच बँकेच्या एटीएममधून मोफत रक्कम काढता येते. सध्या बँका सहा प्रमुख महानगर, बेंगळुरु, चेन्नई, हैदरबाद, कोलकत्ता, मुंबई आणि नवी दिल्लीत ही सेवा देत आहे. तर इतर शहरात महिन्याला तीन वेळा मोफत व्यवहार करता येतो.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.