AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, गृहकर्ज पूर्वीपेक्षा स्वस्त, कार खरेदी करणाऱ्यांना लाभ

बँक ऑफ महाराष्ट्रने एका निवेदनात म्हटले आहे की, रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.90 टक्क्यांवरून 6.80 टक्के करण्यात आलाय. व्याजदरातील कपात तात्काळ प्रभावाने म्हणजेच 11 ऑक्टोबर 2021 पासून लागू करण्यात आली. घर, कार, शिक्षण, वैयक्तिक कर्ज आणि MSME कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना व्याजदरात कपात केल्याचा लाभ मिळेल.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, गृहकर्ज पूर्वीपेक्षा स्वस्त, कार खरेदी करणाऱ्यांना लाभ
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Oct 11, 2021 | 3:26 PM
Share

नवी दिल्लीः बँक ऑफ महाराष्ट्रने सोमवारी व्याजदर कमी करण्याची घोषणा केली. बँकेच्या म्हणण्यानुसार, सणांचा हंगाम पाहता व्याजदरांमध्ये 10 बेसिस पॉइंटने कपात करण्यात आलीय. व्याजदर कमी झाल्यामुळे घर, कार आणि इतर कर्ज स्वस्त होणार आहे. अलिकडच्या काही महिन्यांत अनेक बँकांनी सरकारी, खासगी बँका तसेच वित्त कंपन्यांसह व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतलाय.

रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.90 टक्क्यांवरून 6.80 टक्के

बँक ऑफ महाराष्ट्रने एका निवेदनात म्हटले आहे की, रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.90 टक्क्यांवरून 6.80 टक्के करण्यात आलाय. व्याजदरातील कपात तात्काळ प्रभावाने म्हणजेच 11 ऑक्टोबर 2021 पासून लागू करण्यात आली. घर, कार, शिक्षण, वैयक्तिक कर्ज आणि MSME कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना व्याजदरात कपात केल्याचा लाभ मिळेल.

किती व्याजदर असणार?

बँक ऑफ महाराष्ट्रच्या माहितीनुसार, ओवरनाइट MCLR 6.70 टक्के, 1 महिन्यासाठी 6.80 टक्के, 3 महिन्यांच्या MCLR 7.10 टक्के आणि 6 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.15 टक्के करण्यात आलाय. एक वर्षाचा MCLR 5 बेसिस पॉइंटने कमी करून 7.25% केलाय. सणांचा हंगाम पाहता बँक ऑफ महाराष्ट्रने काही दिवसांपूर्वी घर, कार आणि सुवर्ण कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.

सुवर्ण कर्जाच्या विभागावर शून्य प्रक्रिया शुल्काचा लाभ

बँकेने म्हटले आहे की, आरएलएलआर कमी केल्यानंतर ग्राहकांना गृहकर्ज, कार कर्ज आणि सुवर्ण कर्जाच्या विभागावर शून्य प्रक्रिया शुल्काचा लाभ मिळेल. सणासुदीच्या काळात ग्राहकांना स्वस्त कर्ज देण्यासाठी ही पावले उचलण्यात आलीत. आरएलएलआर कमी केल्यानंतर गृह कर्जावरील व्याजदर 6.8 टक्के, कार कर्जावर 7.05 टक्के आणि सुवर्ण कर्जावर 7 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला.

…आणि बँकांनीही दिलासा दिला

सणांचा हंगाम पाहता अनेक बँकांनी व्याजदर कमी करण्याची घोषणा केली. एसबीआय केवळ 6.70 टक्के दराने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन देते. याअंतर्गत ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला असेल, त्याच्यासाठी गृहकर्ज स्वस्त होईल. पुढे नॉन-पगारदार कर्जदाराला लागू असलेला व्याजदर पगारदार कर्जदाराला लागू असलेल्या व्याजदरापेक्षा 15 बीपीएस जास्त होता. SBI ने पगारदार आणि वेतन नसलेल्या कर्जदारांमधील हा फरक दूर केला. तसेच बँक ऑफ बडोदाने सणासुदीच्या आधी किरकोळ कर्ज ऑफरची घोषणा केली. ही ऑफर होम लोन आणि कार लोन उत्पादनांसाठी लागू असेल. बीओबीने गृह आणि कार कर्जाच्या सध्याच्या व्याजदरांवर 0.25 टक्के सूट दिली.

किरकोळ व्याजदरात 0.10 टक्के कपात जाहीर

त्याचप्रमाणे एचडीएफसी लिमिटेडनेही त्याच्या किरकोळ व्याजदरात 0.10 टक्के कपात जाहीर केली. एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, गृहकर्जावरील किरकोळ मुख्य कर्जाच्या व्याजदरात 0.10 टक्के कपात करण्यात आली. नवीन दर 10 नोव्हेंबर 2020 पासून लागू झालेत. सर्व विद्यमान ग्राहकांना व्याजदरातील या बदलाचा लाभ मिळेल. आणखी अनेक बँकांनी सणांचा हंगाम लक्षात घेऊन व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतलाय.

संबंधित बातम्या

5 ते 10 रुपयांच्या ‘या’ पाऊचमधून रेल्वे वाचवणार 1,200 कोटी, नवीन योजना काय?

देशात लवकरच 6G नेटवर्कची चाचणी, डाऊनलोड स्पीड 5G पेक्षा 50 पट वेगवान, कधी सुरू होणार?

Big news for Bank of Maharashtra customers, home loans cheaper than before, benefits to car buyers

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…