Bitcoin ने तोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड! गुंतवणूकदार असे झाले मालामाल

Bitcoin | अखेर क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठा फेरबदल झाला. बिटकॉईनने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले. 28 महिन्यानंतर बिटॉकाईनने हनुमान उडी घेतली. नोव्हेंबर 2021 मध्ये बिटकॉईन 68,991 डॉलरसह सर्वकालीन उच्चांकावर पोहचले होते. हा विक्रम आता मोडीत निघाला. गेल्या एका वर्षांत बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 200 टक्के रिटर्न दिला.

Bitcoin ने तोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड! गुंतवणूकदार असे झाले मालामाल
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 9:19 AM

नवी दिल्ली | 6 March 2024 : जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीने 28 महिन्यानंतर रेकॉर्ड मोडीत काढला. बिटकॉईनने जागतिक बाजारात 69 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला. या वर्षात बिटकॉईनने गुंतवणूकदारांना जवळपास 60 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, बिटकॉईनच्या या तेजीमागे दोन प्रमुख कारणं आहेत. अमेरिकेत क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये गुंतवणूकदार सातत्याने गुंतवणूक करत आहेत. तर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपातीचे संकेत मिळत आहे. त्याचा परिणाम या सर्वकालीन घौडदौडीत दिसून येत आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये 68,991 डॉलरसह बिटकॉईन सर्वकालीन उच्चांकावर पोहचले होते. हा विक्रम आता मोडीत निघाला. गेल्या वर्षभरात बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा दिला.

सर्वकालीन उच्चाकांवर बिटकॉईन

मंगळवारी जागतिक बाजारात बिटकॉईनचा भाव 28 महिन्यांच्या विक्रमी स्तरावर पोहचला होता. नोव्हेंबर 2021 मध्ये बिटकॉईनच्या नावावर 68,991 डॉलरचा विक्रम आहे. हा रेकॉर्ड इतिहासजमा झाला. व्यापारी सत्रात बिटकॉईन 69,208.79 डॉलरच्या पण पुढे गेले. विशेष म्हणजे या 28 महिन्यात बिटकॉईन 20 हजार डॉलरहून निच्चांकावर पोहचले होते. व्याजदर वाढल्याने हा फरक दिसून आला. बिटकॉईनसह इतर क्रिप्टोकरन्सीत पण घसरण दिसून आली.

हे सुद्धा वाचा

कारण तरी काय?

अमेरिकेत क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये बिटकॉईनची मागणी वाढली आहे. पुरवठा कमी असल्याने किंमतीत वाढ झाली. तर अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने येत्या काही महिन्यात व्याजदरात कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे डॉलर इंडेक्स घसरला आहे. परिणामी बिटकॉईनची किंमत वधारली आहे. अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने 11 स्पॉट बिटकॉईन ईटीएफला मंजुरी दिल्यानंतर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढवली आहे.

एक वर्षात 200 टक्क्यांचा परतावा

ऑक्टोबरनंतर बिटकॉईनमध्ये जवळपास 160 टक्क्यांची वाढ दिसून आली. 44% वृद्धी एकट्या फेब्रुवारी महिन्यात दिसून आली. या वर्षात आतापर्यंत बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांच्या जवळपास रिटर्न दिला आहे. तर गेल्या एका आठवड्यात बिटकॉईनने 20 टक्के झेप घेतली. एका वर्षात बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांचा परतावा दिला. तर एका महिन्यात हा परतावा जवळपास 60 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. गुंतवणूकदार मालामाल झाले.

Non Stop LIVE Update
माझ्या नादी लागू नको... अजितदादांची दमदाटी कुणावर? सुळेंचा पलटवार
माझ्या नादी लागू नको... अजितदादांची दमदाटी कुणावर? सुळेंचा पलटवार.
उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, जेलधून बाहेर येताच केजरीवाल यांचा दावा
उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, जेलधून बाहेर येताच केजरीवाल यांचा दावा.
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.