AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीएनजी दरवाढीचा फटका, मुंबईत येत्या जूनपासून टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. या दरवाढीचा फटका हा टॅक्सी चालकांना बसत असून, टॅक्सी चालकांकडून भाड्यात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सीएनजी दरवाढीचा फटका, मुंबईत येत्या जूनपासून टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: May 03, 2022 | 1:54 PM
Share

मुंबई : देशात महागाई (Inflation) सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामन्यांचे कंबरडे मोडले आहे. आता यात महागाईचा आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. एक जूनपासून मुंबईत (Mumbai) टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ होऊ शकते. तसा इशारा टॅक्सी मेन्स युनियनच्या (Taxi Men’s Union) वतीने देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे 25 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र अद्यापही टॅक्सी भाड्याच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसून, भाडे स्थिर आहेत. याचा मोठा फटका हा टॅक्सीचालकांना सहन करावा लागत आहे. टॅक्सी व्यवसाय तोट्यात सुरू असून, येत्या 15 मेपर्यंत शासनाने टॅक्सीच्या भाड्यात वाढ करावी, भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये करावे अशी मागणी टॅक्सी चालक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. जर 15 मे पर्यंत भाडेवाढ करण्यात आली नाही तर एकतर्फी भाडेवाढ करू असा इशारा टॅक्सीचालकांनी दिला आहे.

सीएनजीच्या दरात वाढ

एकीकडे गेल्या सहा एप्रिलपासून राज्यासह देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. सीएनजीचे दर चार रुपयांनी वाढवण्यात आल्याने सीएनजीचे दर प्रति किलो 76 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दरात किलोमागे तब्बल 25 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र सीएनजीचे दर वाढत असताना देखील टॅक्सीच्या भाड्यात वाढ न झाल्याने टॅक्सी चालकांचा तोटा होत आहे. त्यामुळे टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी टॅक्सी मेन्स युनियनच्या वतीने करण्यात आली आहे, संघटनेकडून भाडेवाढीसाठी 15 मेपर्यंत मुदत देखील देण्यात आली आहे. जर 15 मे नंतर देखील भाड्यात वाढ न झाल्यास एक जूनपासून एकतर्फी भाड्यात वाढ करू असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

पेट्रोल,डिझेलचे दर स्थिर

समाधानाची बाब म्हणजे गेल्या 28 दिवसांपासून राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली. मात्र सहा एप्रिलनंतर भाववाढीला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत पेट्रोल 120.21 तर डिझेल 104.6 रुपये लिटर आहे. राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करावा असे आवाहन केंद्राकडून राज्यांना करण्यात आले आहे.

Follow Us
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय