AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Motors: एप्रिलमध्ये टाटा मोटर्स मालामाल; तब्बल इतक्या वाहनांची झाली विक्री

एप्रिलमध्ये बहुतांश वाहन (Vehicles) कंपन्यांच्या विक्रीत घट झालेली आहे. मारुती सुझुकी, ह्युंडाई आणि होंडा यांसारख्या कंपन्यांना चिपचा तुटवडा आणि सप्लाय चेनच्या समस्यांमुळे तोटा सहन करावा लागला. चिप टंचाईमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

Tata Motors: एप्रिलमध्ये टाटा मोटर्स मालामाल; तब्बल इतक्या वाहनांची झाली विक्री
एप्रिलमध्ये टाटा मोटर्स मालामालImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 12:17 PM
Share

सेमीकंडक्टरची कमतरता आणि सप्लाय चेनच्या विविध आव्हानांमुळे, एप्रिल महिन्यात बहुतांश वाहन कंपन्यांच्या कार विक्रीत घट झालेली आहे. भारतीय पॅसेंजर कार (Passenger car) मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावरील मारुती सुझुकी किंवा ह्युंदाई आणि होंडा कार्स इंडिया (Honda Cars India) सारख्या कंपन्यांनी एप्रिलमध्ये कारच्या विक्रीत घट नोंदवली आहे. दरम्यान, या सर्वांमध्ये टाटा मोटर्सने (Tata Motors) मात्र बाजारातील ट्रेंडला मागे टाकले असून गेल्या महिन्यात कंपनीच्या कारच्या विक्रीत तब्बल 66 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

मारुती सुझुकीला फटका

देशातील सर्वात मोठी प्रवासी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने सांगितले, की गेल्या महिन्यात त्याची विक्री 5.6 टक्क्यांनी घटली आहे. कंपनीने एप्रिल 2021 मध्ये 1,59,691 प्रवासी कार विकल्या. एप्रिल 2022 मध्ये हा आकडा 1,50,661 युनिट्सवर आला आहे. एप्रिल 2022 मधील विक्रीचा आकडा देखील एका महिन्यापूर्वी म्हणजेच मार्च 2022 च्या तुलनेत 11.2 टक्के कमी झाला आहे.

यामुळे झाला विक्रीवर परिणाम

या कालावधीत मारुती सुझुकीची निर्यात 6.8 टक्क्यांनी वाढून 18,413 युनिट्सवर पोहोचली आहे. मिनी आणि कॉम्पॅक्ट वाहन विभागातील विक्री 21.6 टक्क्यांनी घसरून 76,321 युनिट्सवर आली आहे. दुसरीकडे, युटिलिटी वाहनांची विक्री 33.18 टक्क्यांनी वाढून 33,941 युनिट्सवर पोहोचली आहे. चिपच्या कमतरतेमुळे त्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, हा प्रभाव मर्यादित असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे.

ह्युंदाई आणि होंडाच्या विक्रीतही घट

मारुती सुझुकीप्रमाणे, ह्युंडाईच्या विक्रीतही एप्रिल 2022 मध्ये घट झाली. कंपनीने गेल्या महिन्यात 56,201 युनिट्सची विक्री केली, जी एप्रिल 2021 मध्ये 59,203 युनिट्सच्या विक्रीपेक्षा 5 टक्के कमी आहे. या कालावधीत कंपनीची निर्यात 19.6 टक्क्यांनी वाढून 12,200 युनिट्सवर गेली आहे. त्याचप्रमाणे होंडाच्या कारची विक्री वर्षभरात 13.2 टक्क्यांनी घसरली.

टाटा मोटर्सच्या विक्रीत वाढ

दुसरीकडे, टाटा मोटर्सने एप्रिल 2022 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. टाटा मोटर्सच्या एकूण वाहन विक्रीत एप्रिलमध्ये वार्षिक 73 टक्के वाढ झाली आणि तिचा आकडा 72,468 युनिट्सवर पोहोचला. प्रवासी वाहनांच्या बाबतीत, टाटा मोटर्सची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 66 टक्क्यांनी वाढून 41,587 युनिट्सवर गेली आहे. कंपनीने कमर्शिअल व्हेइकल सेगमेंटमध्येही मोठा नफा कमावला आहे. एप्रिल 2022 मध्ये टाटा मोटर्सने या सेगमेंटमध्ये 30,838 वाहने विकली. हे एका वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये झालेल्या 16,515 युनिटच्या विक्रीपेक्षा 87 टक्के अधिक आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.