कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ; पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ; पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरामध्ये तेजी आली आहे. मंगळवारी कच्च्या तेलाचे दर 0.25 टक्क्यांनी वाढले. कच्च्या तेलाचे भाव  78.75 डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले आहेत. चालू आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 28, 2021 | 1:52 PM

नवी दिल्ली : आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरामध्ये तेजी आली आहे. मंगळवारी कच्च्या तेलाचे दर 0.25 टक्क्यांनी वाढले. कच्च्या तेलाचे भाव  78.75 डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले आहेत. चालू आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे. सोमवारी देखील कच्च्या तेलाचे दर वाढले होते. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर देखील भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. जवळपास गेल्या दीड महिन्यापासून इंधनाच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मध्यतंरी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. तरी देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. आता किमती वाढल्यानंतर देखील इंधनाचे दर जैसे थे आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 95.41 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल डिझेलचे दर 101.40 रुपये आणि  91.43 रुपये इतका आहे. दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती या प्रती बॅरल 90 डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतात इंधनाच्या किमती वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या

चांगल्या बँकिंगसाठी Bad Bank :  कर्ज वसुलीसाठी नवीन प्रयोग, बँकेची बॅलन्सशीटही सुधारणार

Share Market | गुंतवा बिनधास्त, चांगला परतावा हमखास, या शेअरमधून मिळतील तुम्हाला घसघशीत परतावा

भविष्यातील कटकट टाळण्यासाठी हा बदल हवाच, वाहन नावावर करण्याची झंझट छुमंतर, या पद्धतीने करा मोटर वाहन मालकी हस्तांतरण  

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें