Home loan | अ‌ॅक्सिस बँकेकडून ‘दिल से ओपन सेलिब्रेशन’, गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात

अ‌ॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 6.90 टक्के व्याजदराने गृहकर्ज देणार आहे. कर्जाची ही ऑफर स्टेट बँकेच्या गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षाही कमी आहे. (Dil Se Open Celebration offer for home loan by axis bank)

Home loan | अ‌ॅक्सिस बँकेकडून 'दिल से ओपन सेलिब्रेशन', गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात
LGBTQIA साठी अॅक्सिस बँकेचा नवा नियम
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 10:03 AM

नवी दिल्ली : सणांच्या मुहुर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सरकारी तसेच खासगी बँकांनी वेगवेगळ्या सवलती देण्यास सुरुवात केली आहे. बँकिंग क्षेत्रात अग्रणी मानल्या जाणाऱ्या अ‌ॅक्सिस बँकेनेही (Axis Bank) खास सवलती जाहीर केल्या आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ‘दिस से ओपन सेलिब्रेशन’ (Dil Se Open Celebrations) नावाची बंपर ऑफर आणली आहे. (Dil Se Open Celebration offer for home loan by axis bank)

या ऑफर अंतर्गत बँकेने घर खऱेदीसाठी व्याजदरात मोठी कपात केली असून अ‌ॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 6.90 टक्के व्याजदराने गृहकर्ज देणार आहे. कर्जाची ही ऑफर स्टेट बँकेच्या गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षाही कमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 6.95 टक्के दराने गृहकर्ज देते. अ‌ॅक्सिस बँकेने जाहीर केलेल्या या ऑफरमुळे घर खरेदी करणाऱ्यांठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.

कोरोना महामारीमुळे (COVID-19 Pandemic) स्थावर मालमत्ता क्षेत्रात मोठी मंदी आलेली आहे. विकासकांनी घरं बांधून ठेवलेली असली तरी, ग्राहक त्यांना खऱेदी करण्याच्या मानसिकतेत नाहीत. कोरोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था त्याला कारण असल्याचं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. अशात सणांच्या पार्श्वभूमीवर अ‌ॅक्सिस बँकेने घर खरेदीसाठी ‘दिल से ओपन सेलिब्रेशन’ नावाची ऑफर आणली आहे.

7.99 टक्क्याने कार लोन

अ‌ॅक्सिस बँकेने 7.99 टक्के व्याजदराने कार लोन उपलब्ध करण्याचे जाहीर केले आहे. तसेच वाहनांच्या ऑनरोड किमतीवर बँक 100 टक्के कर्ज देणार आहे. पर्सनल लोन 10.49 टक्के तर एज्युकेशन लोन 10.50 टक्के व्याजदराने देण्याचे बँकेने जाहीर केले आहे.

दरम्यान, अ‌ॅक्सिस बँकेने वेगवेगळ्या शॅपिंग कंपन्यांसोबत करार केला आहे. या करारानुसार ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षक ईएमआयची (EMI) सुविधा असेल. बँकेने फ्लिपकार्ट,वेस्टसाईट, मार्क्स अ‌ॅण्ड स्पेंसर्स, अ‌ॅमेझॉन, एलजी, वर्लपूल, एचपी, डीमार्ट अशा मोठ्या ब्रँड्ससोबत करार केले आहेत. त्यानुसार आपल्या सोयीच्या ईएमआयला निवडून ग्राहकांना हवी तशी खरेदी करता येणार आहे.

संबंधित बातम्या : LIC कंपनी झाली मालामाल, तुमच्याच पैशांनी कमावले तब्बल 15 हजार कोटी

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं आणखी स्वस्त, वाचा आजचे दर

Big offer : 4 % हून कमी व्याजदरात मिळणार गृह कर्ज, 25 हजार ते 8 लाखांपर्यत व्हाऊचर

(Dil Se Open Celebration offer for home loan by axis bank)

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.