EMI वर वस्तू खरेदी करणे कितपत योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत काय?
हल्ली काहीही विकत घेणं अवघड नाही. तुम्ही कमी पैशात ईएमआयवर काहीही सहज खरेदी करू शकता. ईएमआयमध्ये तुम्हाला व्याजासह दर महिन्याला थोडी रक्कम भरावी लागते, पण ते कितपत योग्य आहे हे जाणून घेऊयात

तुम्ही कमी पैशात ईएमआयवर काहीही सहज खरेदी करू शकता. ईएमआयमध्ये तुम्हाला व्याजासह दर महिन्याला थोडी रक्कम भरावी लागते, पण ते कितपत अचूक आहे ते जाणून घेऊया.
आजच्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पूर्वी जी कामे करण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागत असे, ती कामे आजकाल काही सेकंदात केली जातात. यातील एक सुविधा म्हणजे फायनान्स. आजकाल फायनान्सशी निगडीत सर्वात मोठं काम फोनद्वारे काही सेकंदात केलं जातं. जसे की कर्ज घेणे. आजकाल लोकांना बँकेकडून कर्ज घेण्याची खूप आवड आहे. काही लोक घर घेण्यासाठी गृहकर्ज घेत आहेत, तर काही जण कार खरेदी साठी कार लोन घेत आहेत. इतकंच नाही तर हल्ली लोक ईएमआयवर फोन, एसी, कूलर, फ्रिज, विमानाचं तिकीट घेत आहेत.
हल्ली काहीही विकत घेणं अवघड नाही. तुम्ही कमी पैशात ईएमआयवर काहीही सहज खरेदी करू शकता. ईएमआयमध्ये तुम्हाला व्याजासह दर महा थोडी रक्कम भरावी लागते. जेव्हा तुम्ही ईएमआयवर एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा ती वस्तू तुम्हाला त्याच्या वास्तविक किमतीपेक्षा जास्त किंमतीत मिळते.
ईएमआय म्हणजे डेट ट्रॅप
फायनान्शिअल एक्स्पर्ट तापस चक्रवर्ती यांनी आपल्या लिंक्डइनवर पोस्ट करत ईएमआयला कर्जाचा सापळा म्हटले आहे आणि सांगितले आहे की, ईएमआयचा बोजा आजकाल लोकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवत आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, भारतातील लोकांसाठी सर्वात मोठा सापळा महागाई किंवा कर नाही तर तो ईएमआय आहे. आजकाल लोकांचा ईएमआय त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे.
तापस चक्रवर्ती पुढे सोप्या शब्दात ईएमआय डेट ट्रॅपचे सूत्र समजावून सांगतात. “कमवा, उधार घ्या, परतफेड करा, मग पुनरावृत्ती करा, बचत नाही, पुन्हा स्वाइप करा,” ते म्हणाले. लोकांचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी ईएमआयची सुविधा सुरू करण्यात आली होती, पण हा ईएमआय हळूहळू लोकांसाठी जगण्याचा मार्ग बनत चालला आहे.
5 पैकी 3 लोकांमागे 3 पेक्षा जास्त कर्ज
तापस चक्रवर्ती पुढे म्हणाले की, देशांतर्गत कर्ज भारताच्या जीडीपीच्या 42% पर्यंत पोहोचले आहे. यातील मोठा हिस्सा क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि “आता खरेदी करा, नंतर पैसे द्या” या पर्यायांमधून येतो. इतकंच नाही तर भारतात विकल्या जाणाऱ्या आयफोनपैकी 70 टक्के आयफोन ईएमआयवर खरेदी केले जात आहेत. तर तज्ज्ञांच्या मते, दर 5 पैकी 3 लोकांकडे 3 पेक्षा जास्त कर्ज आहे.
