PF खातेधारकांसाठी चांगली बातमी, नव्या निर्णयामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा फायदा
EPF Account Transfer: 15 जानेवारी 2025 रोजी ईपीएफओकडून एक परिपत्रक काढण्यात आले. त्यानुसार, जुन्या कंपनीने नवीन कंपनीकडे ऑनलाईन अर्ज पाठवण्याची गरज नाही. पीएफधारकच स्वत: खाते ट्रन्सफरसाठी क्लेम करु शकतात.

EPF Account Transfer: खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघठनेने (EPFO) सर्व कर्मचाऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतला आहे. ईपीएफओने कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हीडंट फंड (PF) अकाऊंट ट्रन्सफर करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. यासंदर्भात ईपीएफओकडून परिपत्रक जारी करण्यात आले.
ईपीएफओच्या परिपत्रकानुसार, पीएफ खाता ट्रन्सफर करण्यासाठी जुन्या किंवा नवीन कंपनीस ऑनलाईन अर्ज पाठवण्याची गरज असणार नाही. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून बेसिक पगारातील 12 टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जाते. तसेच इतकीच रक्कम कंपनीसुद्ध टाकते. कंपनीकडून कर्मचाऱ्यांचा जमा होणाऱ्या पीएफधील 8.33% टक्के भाग पेन्शनमध्ये तर 3.67% टक्के भाग पीएफमध्ये जातो.
15 जानेवारी 2025 रोजी ईपीएफओकडून एक परिपत्रक काढण्यात आले. त्यानुसार, जुन्या कंपनीने नवीन कंपनीकडे ऑनलाईन अर्ज पाठवण्याची गरज नाही. पीएफधारकच स्वत: खाते ट्रन्सफरसाठी क्लेम करु शकतात.
कोणाला होणार फायदा
- कर्मचाऱ्यांचे एक ही UAN (01/10/2017 नंतर दिलेले UAN) नंबर असेल आणि आधार क्रमांकाशी UAN जोडलेला असले, त्याला फायदा होणार आहे.
- वेगवेगळे UAN क्रमांक असतील परंतु एक क्रमांक आधारशी जोडलेला असेल त्या क्रमांकासाठी ही सुविधा घेता येणार आहे.
- एक ही UAN मध्ये खाते ट्रन्सफर करताना UAN आधारसोबत जोडलेले हवेच तसेच सदस्याचे ID नाव, जन्म तारीख ही माहितीपण बरोबर हवी.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या परिपत्रकानुसार वरील प्रकरणांमध्ये, आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ट्रन्सफरसाठी थेट दावा करू शकतात. म्हणजेच जर UAN आधारशी लिंक असेल आणि जर ग्राहकांनी दिलेले वैयक्तिक तपशील सर्वत्र तंतोतंत जुळत असतील तर भविष्य निर्वाह निधी नियोक्ताकडून पडताळणीची गरज असणार नाही.
ईपीएफओ पोर्टलवर ईपीएफ यूएएनला आधारसोबत कसे लिंक करावे?
- सर्वप्रथम EPFO वेबसाइटला भेट द्या आणि UAN लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून तुमच्या EPF खात्यात लॉग इन करा.
- त्यानंतर ‘मॅनेज’ मेनूमधील KYC पर्यायावर क्लिक करा.
- आधार निवडा आणि तुमचा आधार तपशील प्रविष्ट करा.
- त्यानंतर UIDAI डेटा वापरून तुमचा आधार सत्यापित करा.
- केवायसी पूर्ण झाल्यानंतर, आधार ईपीएफ खात्याशी जोडला जाईल.
