AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिअरच्या किंमतीत फ्रॉड, तुम्ही जास्त पैसे मोजले?

मुंबई : आंतरराष्ट्रीय बिअर कंपन्या Carlsberg, SABMiller आणि भारतीय कंपनी युनायटेड ब्रेव्हरीज (United Breweries) यांनी हातमिळवणी करून 11 वर्षांपासून बिअरच्या किंमतीत गोलमाल केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीसीआयचा (CCI)च्या अहवालातून हे समोर आले आहे.(Fraud in beer prices, did you count too much money?) न्यूज एजेंसी राॅयटर्सच्या वृत्तानुसार, या कंपन्यांमधील वरिष्ठ अधिका-यांनी मिळून देशातील […]

बिअरच्या किंमतीत फ्रॉड, तुम्ही जास्त पैसे मोजले?
| Updated on: Dec 12, 2020 | 12:12 PM
Share

मुंबई : आंतरराष्ट्रीय बिअर कंपन्या Carlsberg, SABMiller आणि भारतीय कंपनी युनायटेड ब्रेव्हरीज (United Breweries) यांनी हातमिळवणी करून 11 वर्षांपासून बिअरच्या किंमतीत गोलमाल केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीसीआयचा (CCI)च्या अहवालातून हे समोर आले आहे.(Fraud in beer prices, did you count too much money?)

न्यूज एजेंसी राॅयटर्सच्या वृत्तानुसार, या कंपन्यांमधील वरिष्ठ अधिका-यांनी मिळून देशातील बिअरच्या किंमती 11 वर्षांसाठी निश्चित केल्या होत्या. रॉयटर्सने असाही दावा केला आहे की, त्यांनी सीसीआय (CCI) चा अहवाल पाहिला आहे. परंतु, त्यावर अद्याप सीसीआयचा (CCI) कोणताही आदेश आलेला नाही आणि सीसीआयचे वरिष्ठ अधिकारी यावर निर्णय घेतील. अहवालानुसार सन 2007 ते 2018 दरम्यान फिक्सिंग करण्यात आली होती. सीसीआयच्या 248 पानांच्या अहवालात म्हटले आहे की, “ब्रेव्हर्सनी एकत्रितपणे येऊन सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला आणि कायद्याचे उल्लंघन केले आहे.

2018 मध्ये सीसीआयने या तीन बिअर कंपन्यांच्या ठिकाणी छापा टाकला आणि तपास सुरू केला. या तपासात कंपन्यां दोषी आढळल्या आहेत. भारतातील सुमारे 52 हजार कोटींच्या बिअर मार्केटमध्ये त्यांचा वाटा 88 टक्के आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा अहवाल मार्चमध्ये तयार करण्यात आला होता.

आत्ता, सीसीआयचे वरिष्ठ अधिकारी यावर विचार करतील आणि कंपन्यांना सुमारे 250 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त दंड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांमधील संभाषण व्हॉट्सअॅप मेसेजेस आणि ई-मेलचा समावेश सीसीआय अहवालात करण्यात आला आहे. या कंपन्यांनी परस्पर समन्वयाने बर्‍याच राज्यात बियरच्या किंमती वाढवल्या आल्याचे दिसून आले. या कंपन्यांनी ऑल इंडिया ब्रेव्हर्स असोसिएशनचा (एआयबीए) वापर केला आणि परस्पर बियरच्या किंमती निश्चित केल्या. त्यानंतर एआयबीएने या कंपन्यांच्या वतीने किंमती वाढवण्यासाठी लॉबिंग केले.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनकाळातील बुकिंग, विमान कंपन्यांकडून प्रवाशांना कोट्यावधी रुपये रिफंड केल्याचा दावा, काय सत्य?

पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राच्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पाठिंबा!

(Fraud in beer prices, did you count too much money?)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.