Gold Rate Today: सोन्याची हनुमान उडी! 46 वर्षांचा रेकॉर्ड तोडणार? 1979 नंतर सोन्यासह चांदी खाणार भाव
नोव्हेंबर महिन्यात सोने त्याच्या रेकॉर्डस्तरावरून घसरले आहे. पण तरीही सोने जागतिक बाजारात 4,000 डॉलर प्रति औंसपेक्षा अधिक आहे. गेल्या तीन आठवड्यात Gold ETF मध्ये सलग वाढ दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.

Gold New Record: सोन्याच्या किंमतींनी यंदा मोठी भरारी घेतली आहे. या पिवळ्या धातूने जानेवारीपासून ते आतापर्यंत प्रत्येक महिन्यात मोठी झेप घेतली आहे. सोने हे वर्ष 1979 नंतर सर्वात जोरदार कामगिरी बजावत आहे. MCX वर 5 फेब्रुवारीच्या सोने सौद्यात सोमवारी 700 रुपयांहून अधिकची तेजी दिसून आली. गेल्या व्यापारी सत्रात सोने 1,27,667 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर आज सोने 1,28,352 रुपयांवर उघडले. येत्या काही दिवसात लग्नसराईमुळे सोने नवीन रेकॉर्ड करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमेरिकेतील घडामोडींकडे लक्ष
अमेरिकन फेडरल रिझर्व्हद्वारे डिसेंबर महिन्यात व्याज दर घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने मजबूत स्थिती असेल. ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, अमेरिकेत सरकारच्या शटडाऊनमुळे आर्थिक आकडेवारीनुसार अनिश्चितता वाढले. त्याचा थेट फायदा गुंतवणूकदारांना होईल. जागतिक बाजारात शुक्रवारी सोन्यात जवळपास 4,170 डॉलर प्रति औंसवर पोहचले. केवळ एका आठवड्यात यामध्ये 2% हून अधिक वाढ दिसली. व्याजदर जेव्हा कमी होतील. तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळण्याची शक्यता आहे.
तीन दिवसात 1300 रुपयांची वाढ
सध्या लग्नसराईची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसण्याची शक्यता आहे. जळगावच्या सराफा बाजारात गेल्या तीन दिवसात 1300 रुपयांची दरवाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात जवळपास 6,500 रुपयांची वाढ झाली आहे. दोन्ही धातुत अजून मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
किंमती सातत्याने वाढत असतानाच जगभरातील केंद्रीय आणि मध्यवर्ती बँकांनी सोन्याची आक्रमकपणे खरेदी सुरू केली आहे. तिसऱ्या तिमाहीत जगभरातील केंद्रीय बँकांनी एकूण 220 टन सोने खरेदी केले आहे. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा जवळपास 10% अधिक सोन्याची खरेदी या बँकांनी केली आहे.
चांदीची चमक वाढली
आज 29 नोव्हेंबर 2025 रोजी चांदीच्या किंमतीत मोठी तेजी दिसून आली. एक किलो चांदीचा भाव 1,76,100 रुपये इतका आहे. जागतिक बाजारात सलग पाचव्या दिवशी चांदीचा भाव वधारला. जागतिक बाजारात चांदीचा भाव 53.81 डॉलर प्रति औंस होता. तर रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते चांदी लवकरच 70 डॉलर औसवर तर 2026 मध्ये हा भाव 200 डॉलर प्रति औसवर पोहण्याची शक्यता आहे.
