AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सोने महागले, चांदी स्वस्त, पटापट तपासा नव्या किमती

विशेष म्हणजे सोन्याचा भाव वाढत असतानाच चांदीचा भाव 667 रुपयांनी घसरून 61,337 रुपये प्रति किलो झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 62,004 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,794 डॉलर प्रति औंस झाला. दुसरीकडे चांदी 22.94 डॉलर प्रति औंसवर स्थिर होती.

Gold Price Today : सोने महागले, चांदी स्वस्त, पटापट तपासा नव्या किमती
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 8:06 PM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीचा परिणाम हा स्थानिक बाजारांवरही झालाय. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 41 रुपयांनी वाढून 47,217 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 47,176 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली.

चांदीचा भाव 667 रुपयांनी घसरला

विशेष म्हणजे सोन्याचा भाव वाढत असतानाच चांदीचा भाव 667 रुपयांनी घसरून 61,337 रुपये प्रति किलो झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 62,004 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,794 डॉलर प्रति औंस झाला. दुसरीकडे चांदी 22.94 डॉलर प्रति औंसवर स्थिर होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “कॉमेक्स (कमोडिटी मार्केट) मध्ये सोने अर्ध्या टक्क्यांनी वाढून $1,794 प्रति औंस झाले.

सोन्याचा नवा भाव कसा शोधायचा?

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू

1 डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून तुमच्या सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित असा नियम लागू होणार आहे, ज्याचे पालन न केल्यास तुरुंगवास होऊ शकतो. ज्वेलर्सना 30 नोव्हेंबरपर्यंत दिलेली सवलत देण्याची मुदत आज संपणार आहे, म्हणजेच आता हॉलमार्किंगचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे, असे न केल्यास ज्वेलर्सवर कडक कारवाई केली जाऊ शकते. देशभरातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलेय. या अंतर्गत ज्या ज्वेलर्सची उलाढाल 40 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा त्यांनी नोंदणी केलीय, त्यांच्या दुकानातील प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क असणे आवश्यक आहे. याशिवाय विकल्या जाणाऱ्या सर्व दागिन्यांवर हॉलमार्किंगही बंधनकारक आहे.

संबंधित बातम्या

मोदी सरकार आता CEL कंपनीला विकणार, एअर इंडियानंतर दुसऱ्या मोठ्या कंपनीचं खासगीकरण

India Q2 GDP: खूशखबर! देशाची अर्थव्यवस्था रुळावर, दुसऱ्या तिमाहीत GDP 8.4 टक्क्यांवर पोहोचला!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.